You are currently viewing पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे देवस्थान उपसमित्यांच्या समस्या व मागण्यांकडे दुर्लक्ष

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे देवस्थान उपसमित्यांच्या समस्या व मागण्यांकडे दुर्लक्ष

सावंतवाडी :

देवस्थान उपसमित्यांना नवीन उपसमिती स्थापन करण्यासह समितीचा कारभार पाहतानाच्या जाचक अटीं शिथिल करण्याबाबत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अनेक वेळा लक्ष वेधूनही दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे येत्या आठ दिवसात याबाबत योग्य ती कार्यवाही न केल्यास रविवारी २६ जानेवारी पासून देवस्थान समितीच्या सावंतवाडी कार्यालयासमोर सावंतवाडी तालुक्यातील सर्व देवस्थानचे मानकरी आणि उपसमितीचे पदाधिकारी साखळी उपोषणास बसणार असल्याचा इशारा सावंतवाडी तालुका देवस्थान समन्वय समितीने शुक्रवारी देवस्थान समितीला एका निवेदनाद्वारे दिला.

सावंतवाडी तालुका देवस्थान समन्वय समितीची बैठक शुक्रवारी सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली सावंतवाडी राजवाड्यात झाली. सावंतवाडी तालुका देवस्थान समन्वय समिती अध्यक्ष एल. एम. सावंत, (कोलगाव), उपाध्यक्ष ज्ञानेश्वर परब (आंबेगाव), सचिव राजाराम सावंत (बांदा), खजिनदार विलास गवस (वाफोली), सदस्य कृष्णा उर्फ जीजी राऊळ (माडखोल), पंढरीनाथ पु राऊळ (सांगेली), चंदन धुरी (कोलगाव), सुभाष गावडे (चौकुळ), मधुकर देसाई (डेगवे,) विलास सावंत (डिंगणे), लक्ष्मण परब (चराठा), वसंत धुरी (सातोसे) आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा