विधानसभेचे सभापती राहुलजी नार्वेकर यांची राजेंद्र प्रभाकर मसुरकर यांनी घेतली सदिच्छा भेट
विविध विकासकामे तसेच उद्भवणाऱ्या विविध समस्यावर झाली सकारात्मक चर्चा
सावंतवाडी
*महाराष्ट्र राज्य विधानसभेचे सभापती कोकण व सावंतवाडी चे सुपुत्र मा.श्री राहुलजी नार्वेकर हे सिंधुदुर्ग जिल्हा सावंतवाडी शहरामध्ये आपल्या निवासस्थानी आले असताना त्यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून विविध विषयांवरती सविस्तर दीर्घकाळ चर्चा ही जिवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर यांनी केली. अशी माहिती जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी दिली आहे*
*यावेळी संस्थानचे युवराज लखन राजे सावंत भोसले तसेच सामाजिक कार्यकर्ते व भाजपचे नेते दिलीप भालेकर तसेच शिंदे सेनेचे संयोजक श्री प्रतीक बांदेकर भाजप चे संयोजक श्री नागेश जगताप तसेच श्री.महेश बांदेकर श्री सुदेश नेवगी तसेच अनेक कार्यकर्ते यांनी स्वागत समारंभाच्या समयी उपस्थित होते*
*यावेळी महाराष्ट्राचे विधानसभेची सभापती श्री राहुल नार्वेकर यांच्याशी जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री राजू मसुरकर यांनी दीर्घकाळ व विकास कामावरती तसेच महाराष्ट्रातील आरोग्य समस्या बाबत चर्चा केली*
*त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्याला पर्यटन जिल्हा झाल्यानंतर आपल्या जिल्ह्यातील उद्योजकांना तसेच तरुण युवकांना रोजगार कसा मिळेल याबाबत सविस्तर चर्चा राजू मसुरकर यांनी करून तसेच निवेदन देऊन आपण कोकणातील व सिंधुदुर्ग जिल्हा सावंतवाडीतील सुपुत्र असल्याने याबाबत योग्य ती समस्या सोडवा असे निवेदन मा. राहुलजी नार्वेकर यांना दिले आहे*
*अशी माझी व सर्व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेची इच्छा आहे असे मसूरकर यांनी राहुल जी नार्वेकर यांना सांगण्यात आले*
*तसेच त्यांना निवेदन देत असताना त्यामध्ये सिंधुदुर्ग व महाराष्ट्रातील तज्ञ डॉक्टरांना केवळ एक वर्षासाठी जिल्हाधिकारी व सिव्हिल सर्जन याच्याकडे अर्ज करून बोंड केलेल्या डॉक्टर यांना केवळ 85 हजार रुपये पगार दर माहा दिला जातो*
*त्याचप्रमाणे शासनामार्फत भरती झाल्यास एक लाख वीस हजार रुपये तसेच वेगवेगळे अलोन्स चाळीस हजार रुपये एकूण एक लाख साठ हजार रुपये एवढा तूटपुंज पगार शिक्षणाच्या मनाने कमी दिला जातो*
*हा पगार काँग्रेस पक्षाच्या कारकिर्दीमध्ये 25 वर्षांपूर्वीपासूनचा आहे महाराष्ट्रातील महाविद्यालय रुपये प्राध्यापकांना दोन लाख पन्नास हजार रुपये एवढा दर माहा पगार दिला जातो त्याचप्रमाणे आयटी इंजिनियर ला रिलायंस किंवा टाटा अशा विविध कंपनीमध्ये वार्षिक पन्नास लाखाचे पॅकेज असते यामुळे महाराष्ट्रामध्ये डॉक्टर तज्ञ यायला इच्छुक नसतात*
*त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आमचे तरुण युवक युवती हे गोव्यामध्ये नोकरीला आहेत गोव्यामध्ये विविध कंपनी येण्याची कारण म्हणजे 35 वर्षांपूर्वी काँग्रेस पक्षाचे सरकार असताना विविध कंपनी गोव्यामध्ये येण्यासाठी इन्कम टॅक्स मध्ये कंपनीला 50% सूट दिली होती*
*यामुळे विविध कंपनी उद्योग गोव्यामध्ये वाढले गेले त्याचप्रमाणे केंद्र सरकारच्या माध्यमातून बजेटमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा मध्ये व पर्यटन जिल्हा म्हणून या कोकणच्या तरुणांना रोजगार मिळण्याच्या दृष्टीने आपण गोव्यासारख्या विविध कंपनींना इन्कम टॅक्स मध्ये भरीव सूट दिल्यास आपल्या जिल्ह्याचा कायापालट होऊ शकतो व तरुण युवकांना गोवा मुंबई पुणे बेंगलोर अशा विविध शहरांमध्ये नोकरीसाठी जाण्याचा समस्या दूर होऊ शकते*
*त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्हा कुडाळ तालुक्यामध्ये माणगाव या गावी श्री गुरुदेव दत्त अवतार असलेले टेंबे स्वामी महाराज यांच्या वरती सिरीयल चित्रपटांमध्ये दाखवली गेली महाराजांचे अनेक लीला हिंदूस्थानामध्ये झाले आहे तसेच दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र स्वामींकडून तयार झाला तसेच गुरुचरित्र जय हिंदुस्थानामध्ये वाचन करतात ते सुद्धा टेम्मे स्वामींच्या लिखाने झाले आहे आणि ते केवळ श्री गुरुदेव दत्त श्री टेंबे स्वामी यांच्या आशीर्वादाने झाले आणि आपण यासाठी पुढाकार घेतला तर भाविक पर्यटक या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दत्त संप्रदाय नागरिक देशभरातून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येऊ शकतात*
*त्यामुळे आज काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जे चिपीचे तत्कालीन केंद्रीय विमान व वाहतूक पर्यटन मंत्री मा. माधवराव सिंधिया साहेब यांनी माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या माध्यमातून विमानतळ सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाले*
*पर्यटक तसेच जिल्हा बाहेरील नागरिक न येण्यामुळे नागरिक यांच्यामुळे ओस पडलेले आहे त्या विमानतळाला गती मिळू शकेल आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये आज अनेक राजकीय नेत्यांचे आरोप प्रत्यारोप होत आहेत ही निराशा नागरिकांची दूर होऊ शकते असे मसूरकर यांनी सांगण्यात आले*
*त्याचप्रमाणे अनेक उद्योजक हॉटेल व्यवसाय त्याचप्रमाणे टॅक्सी रिक्षा चालक बाजारपेठेमध्ये जिल्ह्यातील लोकांना व्यापार असे अनेक उद्योग ज्याप्रमाणे शिर्डी साईबाबा तसेच शेगावचे गजानन महाराज तसेच तिरुपती बालाजी असे भाविक नागरिक त्या तीर्थस्थानाला जात असतात त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील टेंबे स्वामीं वरती सिरीयल झाल्यास त्याप्रमाणे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सर्वांना व्यापार होऊन व तसेच भाविक पर्यटकांमुळे रोजगार मिळू शकेल*
*त्याचप्रमाणे आज महाराष्ट्रामध्ये अनेक नागरिकांची आपातग्रस्त नुकसान होते नदीला पूर तसेच इमारतीला आग लागणे इमारती वरती झाड कोसळून इमारतीचे नुकसान होणे पावसाळ्यात अतिवृष्टीच्या वेळी भिंत पडणे भूकंप अशा विविध नुकसान भरपाईच्या नागरिकांना केवळ इमारतीचे दहा हजार रुपये नुकसान भरपाई शासनाकडून दिले जाते संपूर्ण घर जमीन दस्त झाल्यानंतर एक लाख रुपये ची आर्थिक मदत शासनाकडून दिली जाते*
*यामुळे गोरगरीब नागरिकांना निराश होऊन एवढी तूटपुंज मदत शासनाकडून मिळाल्यानंतर भ्रमनिरास होतो यासाठी घरपट्टीमध्ये नगरपालिका किंवा ग्रामपंचायत वृक्ष कर व शिक्षण कर आकारला जातो*
*त्याचप्रमाणे ओरिएंटल इन्शुरन्स सारखा कंपनीकडे केवळ वार्षिक दोनशे रुपये एवढा विमा कर भरल्यास पाच लाखाचे कव्हरेज या गोरगरीब नागरिकांना इमारतीच्या नुकसान वेळी मिळू शकते*
*यासाठी आपण शासन निर्णय घेऊन घरपट्टी मध्ये एक तर शासनाने विमा कर भरावा किंवा नागरिकांकडून घरपट्टी मधून वसूल करून घेण्यात यावा*
*यामुळे नागरिकांचे जे अतोनात आपातकालीन नुकसानाचे वेळी होते याला आपण शासन निर्णय घेतल्यास संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांना दिलासा मिळू शकतो*
*असे निवेदन जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री राजू मसूरकर यांनी महाराष्ट्राचे विधानसभेचे सभापती श्री राहुलजी नार्वेकर यांना त्यांच्या निवासस्थानी दीर्घकाळ चर्चा करत असताना देण्यात आले*
*अशी माहिती जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री राजू मसुरकर सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग यांनी दिले आहे*
*राजेंद्र प्रभाकर मसुरकर*
*जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष*
*तथा सोन्या चांदीच्या दागिन्यांचे व्यापारी*
*उभाबजार सावंतवाडी*
*तालुका सावंतवाडी*
*जिल्हा सिंधुदुर्ग*
*महाराष्ट्र राज्य*
*संपर्क ९४२२४३५७६०*
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

