You are currently viewing आज सातुळी येथे जिल्हास्तरीय निमंत्रित खुल्या भजन स्पर्धेचे आयोजन

आज सातुळी येथे जिल्हास्तरीय निमंत्रित खुल्या भजन स्पर्धेचे आयोजन

सातुळी येथील स्वराज्य ग्रुप आणि सातुळी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रसिद्ध दशावतार हार्मोनियम वादक कै. सुभाष लक्ष्‍मण परब यांच्या स्मरणार्थ आज सातुळीत सायंकाळी ७ वाजता जिल्हास्तरीय निमंत्रितांच्या खुल्या भजन स्पर्धा होणार आहे.

Go back

Your message has been sent

Warning
Warning
Warning
Warning

Warning.

या भजन स्पर्धेसाठी जिल्ह्यातील श्री महापुरुष प्रासादिक भजन मंडळ (भोगवे) बुवा तुषार खुळे, श्री ब्राह्मणदेव दत्तप्रसाद भजन मंडळ (मळेवाड) बुवा प्रथमेश मोरजकर, श्रीदेवी माऊली भजन सेवा संघ (इन्सुली) बुवा वैभव राणे, श्री कलेश्वर पूर्वी प्रासादिक भजन मंडळ (वेत्ये) बुवा प्रथमेश निगुडकर, श्री मोरेश्वर प्रासादिक भजन मंडळ (नेरूर) बुवा भार्गव गावडे, श्रीदत्त प्रासादिक भजन मंडळ (वर्दे) बुवा नरेंद्र मेस्त्री, श्री चिंतामणी प्रासादिक भजन मंडळ (वायंगणी सुरंगपाणी वेंगुर्ला) बुवा अनिकेत भगत, श्री महापुरुष प्रासादिक महिला भजन मंडळ पिंगुळी) बुवा प्रसाद आंबडोसकर, श्री सिद्धिविनायक प्रासादिक भजन मंडळ (कणकवली) बुवा दुर्गेश मिठबावकर या नऊ भजन मंडळांना निमंत्रित करण्यात आले आहे.

या भजन स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक १०००१ रूपये, द्वितीय पारितोषिक ७००१ रुपये, तृतीय पारितोषिक ५००१ रुपये, उत्तेजनार्थ पारितोषिक ३००१ रुपये, तसेच या स्पर्धेतील उत्कृष्ट हार्मोनियम विजेत्याला दशावतार स्वरानंद पुरस्कार आणि उत्कृष्ट गायक विजेत्याला राजयोग लक्ष्मी पुरस्कार या विशेष पुरस्कारासह प्रत्येकी २०२५ रुपयाचे पारितोषिक व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. तसेच भजन स्पर्धेतील कोरस, झांज, तबला, उत्कृष्ठ साई गजर व पखवाज वादकाला प्रत्येकी १००० रुपयाचे पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.

या भजन स्पर्धेचे उद्घाटन सायंकाळी ५ वाजता माजी शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर, कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे, सावंतवाडीच्या माजी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, चौकुळचे सामाजिक कार्यकर्ते दिनेश गावडे, गोसोर्स कंपनीचे सीईओ संतोष कानसे, सीओओ राहुल मिश्रा, सिनियर व्ही पी नटवर शर्मा, शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख अँड निता सावंत, माजी पंचायत समिती सदस्य राघोजी सावंत, सरपंच सोनाली परब, उपसरपंच स्वप्निल परब, पोलीस पाटील अरुण परब, शिवसेना शाखाप्रमुख शशिकांत गावडे, दाणोली माजी उपसरपंच प्रशांत सुकी, भजन स्पर्धेचे परीक्षक संजय दळवी, डॉ. दादा परब आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. या भजन स्पर्धेचे पारितोषिक वितरण स्पर्धा संपल्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. तसेच यानिमित्त सायंकाळी ३ वाजता कै सौ. लक्ष्मी भिकाजी कानसे यांच्या स्मरणार्थ आयोजित हळदी कुंकू कार्यक्रमात उपस्थित महिलांमधून लकी विजेत्या महिलेला एक ग्रॅम सोन्याचे नाणे देण्यात येणार आहे. या स्पर्धेचा भजन रसिकानी लाभ घ्यावा असे आवाहन सातुळी येथील स्वराज्य ग्रुप आणि सातुळी ग्रामस्थांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा