You are currently viewing आली संक्रांत आली

आली संक्रांत आली

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री विद्या रानडे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*आली संक्रांत आली*

 

सजल्या चाऱ्याजणी ।आली संक्रांत आली

रूप पाहुनी दर्पणी। गालावर उमटली खळी॥१॥

सोन्याचे फूल खोप्यावर। शोभे चंद्रकोर भाळावर

नथ नाकात मोत्याची ।शोभा वाढे मुखड्याची॥२॥

काळ्या साड्या ठेवणीतल्या ।काढा बाहेर नेसू चला

पारंपारिक पैठणी ही तर| चंद्र कळेवर सोन्याची जरतार॥३॥

येतील मैत्रिणी सार्‍या आता। हळदी कुंकू त्यांच्या स्वागता

एकमेका तिळगुळ देता। परिसरास येईल निर्मलता ॥४॥

तिळाची स्निग्धता,गुळाची पोळी| सिद्धता झाली गुळपोळीची

त्यावर ठेवा तुपाचा गोळा ।संक्रांत आहे गोड गोड बोला ॥५॥

 

विद्या रानडे 24 |12| 23

प्रतिक्रिया व्यक्त करा