काही वेळातच अधिकृत घोषणा होणार
सावंतवाडी :
बांदा येथील ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदासाठी भाजपकडून राजाराम उर्फ आबा धारगळकर यांच्या एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. त्यामुळे ही निवड बिनविरोध होण्याची शक्यता आहे. दुपारी एक वाजता याबाबत अधिकृत घोषणा होणार आहे. उपसरपंच राजाराम सावंत यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी आज निवडणूक घेण्यात आली. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या वेळेला भाजपचे प्रभाग क्रमांक एकचे ग्रामपंचायत सदस्य राजाराम उर्फ आबा धारगळकर यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला. त्यामुळे त्यांची उपसरपंचपदी निवड ही बिनविरोध निश्चित झाली आहे. बांदा शहर ग्रामपंचायत वर भाजपची एक हाती सत्ता आहे. भाजपच्या पक्षीय धोरणानुसार तिसऱ्या वर्षी धारगळकर यांना संधी देण्यात आली आहे. थोड्याच वेळात निवडणूक निर्णय अधिकारी त्यांची निवड जाहीर करणार आहेत.