*वनविभागाच्या जलद बचाव पथकाकडून डिगस गावात वानर पकडण्याची मोहीम, एकूण १५ वानर जेरबंद.*
कुडाळ :
कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात सिंधुदुर्ग जिल्ह्यात माकडांनी घातलेला उपद्रव व शेतकरी बांधवांचे होत असलेले शेतीचे नुकसान या संदर्भात आवाज उठवला होता. याची दखल घेत आजपर्यंत किमान १२०० पेक्षा जास्त माकडांना पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात यश आले. याधर्तीवर आज दि. १६ जानेवारी २०२५ रोजी कुडाळ तालुक्याच्या डिगस गावात प्रथमच माकड पकडण्याची मोहीम गावठणवाडी येथे श्री. शंभू गणू पवार, श्री. सोमदत्त पांडुरंग पवार, श्री. रुपेश जीवबा पवार व श्री. जयेश सुभाष पवार यांच्या घराशेजारी ही मोहीम राबविताना डिगस मा. उपसरपंच श्री. मनोज पाताडे यावेळी ग्रामस्थ श्री. सुजन पावसकर व श्री. महेश शेडगे उपस्थित होते.
वनविभाग सावंतवाडी व वनपरीक्षेत्र कडावल अंतर्गत वनक्षेत्रपाल श्री. कटके यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभाग जलद बचाव पथक मोहीम श्री. अनिल गावडे, श्री. वैभव अमृस्कर, श्री. दिवाकर बांबर्डेकर, श्री. प्रसाद गावडे यांच्याकडुन सदरच्या मोहीमेत एकूण १५ माकडं पकडण्यात यश आले.