You are currently viewing ठाण्यात जीवनविद्या मिशनचा ५६ वा ज्ञानेश्वर माऊली पुण्यस्मरण सोहळा

ठाण्यात जीवनविद्या मिशनचा ५६ वा ज्ञानेश्वर माऊली पुण्यस्मरण सोहळा

ठाणे :

‘हे जग सुखी व्हावे’, या ध्यासापोटी सद्गुरु श्री वामनराव पै यांनी जीवनविद्या तत्वज्ञानाची निर्मिती केली. प्रबोधने, व्याख्याने आणि इतर विविध अभियानांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र व परदेशातही जीवनविद्या मिशनचे कार्य अविरतपणे १९५५ सालापासून सुरू आहे. ऑक्टोबर २०२३ ते ऑक्टोबर २०२४ हे सद्गुरू श्री वामनराव पै यांचे जन्मशताब्दी वर्ष जीवनविद्या मिशनने महाराष्ट्रातील विविध ठिकाणी लोकांसाठी प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करत साजरे केले.

शनिवार, दिनांक १८ जानेवारी व रविवार, दिनांक १९ जानेवारी २०२५ रोजी जीवनविद्या मिशन आयोजित ५६वा ज्ञानेश्वर माऊली पुण्यसमारण सोहळा रेमंड ग्राऊंड, कॅडबरी जंक्शन, ठाणे (प) येथे आयोजित केला आहे. २०१३ नंतर जवळपास ११ वर्षानंतर हा दिव्य सोहळा पाहण्याची संधी ठाणेकरवासीयांना लाभणार आहे.

सायंकाळी ५.०० ते ९.०० या वेळेत कार्यक्रम होणार असून सद्गुरु श्री वामनराव पै यांचे सुपुत्र ज्ञानगुरू श्री प्रल्हाद वामनराव पै यांचे ‘सर्व सुखी सर्व भूती’ या विषयावर मार्गदर्शन होणार आहे. ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ, सुखी जीवनाचा संवाद आणि ‘सर्व सुखी सर्व भूती’ या विषयावर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे व्याख्याते श्री प्रल्हाद पै यांचे मार्गदर्शन हा आगळावेगळा त्रिवेणीसंगम ठाणेकरवासियांना पाहायला मिळणार आहे.

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा