कणकवली :
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा सिंधुदुर्गच्या वतीनेच्या इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा संपूर्ण जिल्ह्यामध्ये एकाचवेळी आयोजित केली होती. कणकवली तालुक्यातील बोर्डवे केंद्रात शाळा ओसगाव नंबर १ या शाळेत गावचे माजी सरपंच श्री बबली राणे यांच्या हस्ते परीक्षेचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी शाळा ओसरगाव नंबर १ चे मुख्याध्यापक श्री किशोर कदम, श्री प्रशांत दळवी, परीक्षा केंद्रसंचालक श्री ईश्वरलाल कदम तसेच श्रीम सायली कदम, श्रीम सुलक्षणा केंद्रे श्रीम प्रमिता तांबे आणि इतर शाळांचे शिक्षकही उपस्थित होते. या परीक्षेसाठी बोर्डवे केंद्रातील चार शाळा सहभागी झाल्या होत्या एकूण १९ विद्यार्थी या परीक्षेसाठी प्रविष्ठ झाले होते. याप्रसंगी सन्माननीय माजी सरपंच ओसरगाव श्री बबली राणे यांनी शिक्षक समितीच्या उपक्रमाचे कौतुक केले. तसेच ओसरगाव नंबर १ शाळेचे मुख्याध्यापक श्री किशोर कदम यांनीही या उपक्रमाचे तोंड भरून कौतुक केले व शुभेच्छा दिल्या. तसेच श्री बबली राणे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त सर्व मुलांना खाऊचे वाटप केले. या याप्रसंगी शिक्षक समितीने त्यांचे आभार व्यक्त केले.