You are currently viewing भविष्यात ज्या ज्या गोष्टीत आपली गरज लागेल तिथे मी मदतीसाठी उभा असेन; आम. निलेश राणे यांचे प्रतिपादन 

भविष्यात ज्या ज्या गोष्टीत आपली गरज लागेल तिथे मी मदतीसाठी उभा असेन; आम. निलेश राणे यांचे प्रतिपादन 

असेन्ट टेकनो सोल्युशन इंजिनीरिंग कंपनी कार्यालयाचा आम. निलेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ

मालवण :

 

भविष्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातून कुशल मनुष्यबळ तयार होण्यामध्ये मेस्त्री बंधूंच्या असेंट टेक्नो सोल्युशन या कंपनीचे मोठे योगदन असणार आहे. मुंबई बाहेर आपले क्षेत्र विस्तारून मोठा धाडसी निर्णय संचालकांनी घेतला आहे. भविष्यात ज्या ज्या गोष्टीत आपली गरज लागेल तिथे मी मदतीसाठी उभा असेन असे प्रतिपादन आमदार निलेश राणे यांनी कुंभारमाठ येथे केले. असेन्ट टेकनो सोल्युशन या इंजिनीरिंग क्षेत्रातील कंपनीच्या मालवण कुंभारमाठ येथील कार्यालयाचा शुभारंभ आमदार निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, असेंट टेक्नो सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड डायरेक्टर संतोष मेस्त्री, सुविधा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडच्या डायरेक्टर सौ वर्षा मेस्त्री,ओबीसी सेल अध्यक्ष आनंद मेस्त्री, ऋतुज मेस्त्री, हर्षित मेस्त्री, प्रकाश मेस्त्री, आनंद मेस्त्री, राजू मेस्त्री, कृष्णा मेस्त्री, श्रीकांत मेस्त्री, शामसुंदर मेस्त्री, मंगेश मेस्त्री, बाबू मेस्त्री, कुंभारमाठ उपसरपंच भोगावकर, जितेंद्र तिरोडकर आदी उपस्थित होते. आमदार निलेश राणे म्हणाले, या मुलांना ज्या दिशेने जायचंय, ती वाट आपणच करून दिली पाहिजे. आमदार म्हणून गणपतीला खडीसाखर अगरबत्ती घरी पाठवणे हे माझं काम नाही. आपल्या मतदारसंघांमध्ये अनेक वर्षांपासून जो विकास निधी आला नाही तो आणणे हे माझं काम आहे. इतर मतदारसंघ आज ८०० कोटीला पोचले पण आपण तीनशे कोटीवर भांडतोय. ज्या नोकऱ्या सरकार उपलब्ध करू शकत नाही त्या नोकऱ्या अशा प्रायव्हेट इन्स्टिट्यूट जेव्हा तयार करतात त्याची सरकारला मदतच होते. आपल्या जिल्ह्याच्या दरडोई उत्पन्न वाढीसाठी अशा संस्था कोकणात आल्या पाहिजे. तरच आपल्या मुलांना कुठेही बाहेर नोकरी करण्यासाठी जावे लागणार नाही. शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत म्हणाले, मेस्त्री बंधूनी उद्याचा भारत कुशल कामगारांचा भारत निर्माण करण्यामध्ये खारीचा वाटा उचलला आहे. खासदार तथा माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सुद्धा या भागाच्या विकासासाठी अनेक प्रकल्प या भागात आणले आहेत. राजकीय विरोध येणाऱ्या प्रकल्पांना करू नका.सध्या राणे पर्व पुन्हा सुरु झाले आहे त्यामुळे विकासाची धमक असलेल्या आमदार निलेश राणे यांच्या पाठीशी सर्वांनी खंबीर पणे राहूया असे आवाहन केले. यावेळी डायरेक्टर संतोष मेस्त्री यांनी प्रस्ताविक करताना कंपनी मालवण येथे सुरु करण्याचा हेतू स्पष्ट करताना विविध उपक्रमांची माहिती दिली. आभार अक्षय सातार्डेकर यांनी मानले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरानी उपस्थिती दर्शवत शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा