पर्यटनवाढीसाठी सिंधुदुर्गात प्राणी संग्रहालय उभारा – नितेश राणे
वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे निवेदन सादर
कणकवली
सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पर्यटनदृष्ट्या विकास व्हावा यासाठी प्राणी संग्रहालयाची उभारणी करण्यात यावी. त्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देवू, अशी मागणी मंत्री नितेश राणे यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे केली आहे.सिंधुदुर्गात अभयारण्य उभारण्यासाठी पोषक वातावरण आहे. या ठिकाणी मोठ्या अनेक प्रजातीचे पक्षी वन्य प्राणी आहेत. त्यामुळे सकारात्मक निर्णय घेतल्यास त्याचा निश्चितच फायदा होणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे. श्री. राणे यांनी नुकतीच नाईक यांची भेट घेतली. यावेळी ही मागणी केली. या प्रसंगी जिल्हा बॅक संचालक विद्याधर परब उपस्थित होते.