*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी गीतकार गायक संगीतकार अरूण गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*
*”संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!”*
जीविका फुलासम आयुष्याला देत सुगंध
आहार वस्त्र निवारा उपजीविका होतIIधृII
कसे जगायचे भाकरी राहे शिकवीत
का जगायचे फुलापासून मिळे बोध
जीवन जगणे कोड्याची उकल करीत।।1।।
मनुष्याला भौतिक गरजा आहेत अटळ
अपेक्षा पूर्तीसाठी मनुष्य वेचीतो आयुष्य
कला रंजन सृजनता जीविका दर्शवीत।।2।।
जीविका निर्गुणाची उपासना होतं
उपजीविका सगुणाची पोटपूजा होत
उपजीविका जीविका मेळाने मिळे आमोद।।3।।
श्री अरुण गांगल.कर्जत,रायगड.महाराष्ट्र.
पिन.410201.
Cell.9373811677.