You are currently viewing १८ जानेवारीला राज्यस्तरीय कथालेखन कार्यशाळेचे आयोजन

१८ जानेवारीला राज्यस्तरीय कथालेखन कार्यशाळेचे आयोजन

*१८ जानेवारीला राज्यस्तरीय कथालेखन कार्यशाळेचे आयोजन*

पिंपरी

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ तसेच साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था – पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दिनांक १८ जानेवारी २०२५ रोजी एकदिवसीय राज्यस्तरीय कथालेखन कार्यशाळेचे भाविसा सभागृह, भावे हायस्कूलमागे, सदाशिव पेठ, पुणे येथे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सकाळी ठीक ११:०० वाजता ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन होणार असून सुप्रसिद्ध साहित्यिक विलास सिंदगीकर अध्यक्षस्थान भूषवतील. ज्येष्ठ साहित्यिक सोपान खुडे आणि सुप्रसिद्ध कवयित्री ज्योत्स्ना चांदगुडे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहील.

भोजनोत्तर दुसर्‍या सत्रात ज्येष्ठ साहित्यिक बबन पोतदार यांच्या अध्यक्षतेखाली आणि सुप्रसिद्ध कथालेखिका प्रा. डॉ. कीर्ती मुळीक व सुप्रसिद्ध कथालेखिका नीलिमा बोरवणकर ‘कथालेखनाचे तंत्र’ या विषयावर आपले विचार मांडतील. ‘कथालेखनाचे घटक आणि लेखकाची अभिव्यक्ती’ या विषयावर तिसऱ्या सत्रात ज्येष्ठ साहित्यिक प्रा. तुकाराम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. सतीश साळुंखे आणि डॉ. धनंजय भिसे आपली मते मांडतील. विलास सिंदगीकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि सुप्रसिद्ध साहित्यिक वि. दा. पिंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप सत्र संपन्न होईल. अधिक माहितीसाठी साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था – पुणेचे अध्यक्ष डॉ. दीपक चांदणे किंवा अस्मिता चांदणे यांच्याशी भ्रमणध्वनी क्रमांक ८३८०००८१८६ अथवा ९७६४४८७२७२ वर संपर्क साधावा.

– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

प्रतिक्रिया व्यक्त करा