डोंबिवली :
परस्परांच्या ओळखीतून स्नेहभाव वृद्धिंगत व्हावा व कौटुंबिक जिव्हाळा निर्माण व्हावा या उद्देशाने प्रतिवर्षी प्रमाणे कोकणवासीय मित्र मंडळ डोंबिवली यांचे रविवारी दि. १९जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ५ ते रात्री ९ या वेळेत सर्वेश सभागृह डोंबिवली (पूर्व) येथे संपन्न होणार असून हा ३७ वा वर्धापन दिन सोहळा संपन्न होताना मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा व वार्षिक बक्षीस वितरण करताना प्रोत्साहन मिळावे असा समारंभाचा उदेश असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. तसेच महिलांकरिता हळदीकुंकू समारंभ आयोजित केला आहे. कोकणवासीय मित्र जेष्ठ नागरिकांचा सन्मानित करुन नेहमी त्यांची उमेद वाढविते. समस्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकणवासीयचे या वर्धापन दिनाकडे लक्ष लागून राहिलेले असते. यातून प्रेम विश्वास आपुलकी तसेच व्यक्त होता येते असे विश्वस्त शशिकांत पराडकर यांनी सांगितले. तरी या स्नेहसंमेलनास उपस्थित राहावे असे अध्यक्ष अशोक चोपडेकर सचिव रत्नाकर सारंग, खजिनदार बापू कुबल यांनी संयुक्तपणे आवाहन केले आहे.