You are currently viewing कुडाळ येथे श्रमिक कामगार संघटनेची सभा संपन्न

कुडाळ येथे श्रमिक कामगार संघटनेची सभा संपन्न

संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष पदी रामदास तेंडोलकर तर महिला जिल्हाध्यक्ष पदी पूजा बागकर यांची नियुक्ती..

कुडाळ :

 

कुडाळ येथे दिनांक १२ जानेवारी २०२५ रोजी बांधकाम कामगार यांची सभा संपन्न झाली. यावेळी कामगार यांनी आपल्या अनेक अडीअडचणी सांगितल्या त्यामध्ये प्रामुख्याने भेडसावत असलेली अडचण म्हणजे काही गावांमध्ये ग्रामसेवक सही देत नाही. काही ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवक आपला मनमानी करून सहीच देणार नाही काय ते करा अशी भाषा वापरून कामगार वर्गाची हेळसांड व कामगार यांना मिळणारे लाभ हे काही ग्रामसेवक यांनी आपल्या मनमानी व हेतुपुरस्सकर पद्धतीने थांबविले आहे. त्या बद्दल कामगार वर्गाने आपल्या अडिअडचणी व्यक्त केल्यात. त्यावर श्रमिक कामगार संघटना अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांनी सदर विषयी आपण गावामधे सर्व कामगार वर्गाची बैठक लावा मी येतो त्या ठिकाणी आपण तक्रारी विषयी सदर ग्रामसेवक यांच्या सोबत बैठक घेऊन सही देतात की नाही याची चर्चा करुया आणि चर्चे अंती सदर ग्रामसेवक यांनी सही देण्यास नकार दिल्यास मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे व आमदार यांच्या जवळ तक्रार करून सदर प्रश्न लवकरात लवकर सोडविण्यात येईल असे सांगीतले.

कामगार वर्गाची शिष्यवृत्तीचा प्रश्न लवकरच मार्गी लागून कामगार यांच्या खात्यात पैसे लवकरच जमा होणार आहेत. अशी माहिती अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांनी दिली. कामगार यांच्या सर्व मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप व गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा फेब्रुवारी महिन्यात कुडाळ येथे घेण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व कामगार यांनी आपल्या मुलांची नाव नोंदणी प्राजक्त चव्हाण यांच्या कडे करावी असे आवाहन करण्यात आले.

श्रमिक कामगार ही संघटना तळागाळातील कामगार वर्गासाठी काम करत आहे त्या अनुषगाने श्रमिक कामगार संघटना सर्व कामगार वर्गाकडे पोहोचावी म्हणून त्यांना त्यांचे लाभ वेळेवर मिळावे यासाठी सभेमध्ये जिल्हा अध्यक्ष निवड करण्यात आली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हाअध्यक्ष पदी रामदास तेंडोलकर तर महिला जिल्हाअध्यक्ष पदी पूजा बागकर व जिल्हा तज्ञ मार्गदर्शक म्हणून किरण कुबल, मिलिंद धुरी तसेच आत्माराम साटेलकर – सावंतवाडी तालुका अध्यक्ष, भैरु पाटील – दोडामार्ग तालुका अध्यक्ष, विजय बागकर – वेंगुर्ला तालुका अध्यक्ष, दीपक देऊलकर – मालवण तालुका अध्यक्ष, गुंडू जाधव – कणकवली तालुका अध्यक्ष, पंकज दुखंडे – देवगड तालुका अध्यक्ष, संदीप चव्हाण – जिल्हा उपाध्यक्ष, अमर आरेकर जिल्हा उपाध्यक्ष, निलेश पांगम – नेमळे प्रभाग अध्यक्ष, कृष्णा गावडे – आडेली प्रभाग अध्यक्ष, कृष्णा राऊत – पेंडूर-मातोंड प्रभाग अध्यक्ष, गुरुनाथ कांदे – वझराट प्रभाग अध्यक्ष, सुदेश किनावडेकर – म्हापण प्रभाग अध्यक्ष, रसिका कदम – पुळास प्रभाग अध्यक्ष, चंद्रशेखर देवळी – तेर्सेबांबर्डे प्रभाग अध्यक्ष, संतोष देऊलकर – बिबवणे प्रभाग अध्यक्ष, अरविंद शिरोडकर – सोनवडे प्रभाग अध्यक्ष, संजना पाटकर – वेताळ बांबार्डे प्रभाग अध्यक्ष, संतोष बांदेकर – तारकर्ली प्रभाग अध्यक्ष, बाळकृष्ण धर्णे – आडेली प्रभाग सचिव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

या सर्वांना श्रमिक कामगार संघटना प्रदेश अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांनी नियुक्ती देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच या सभेला कामगार राजन नागवेकर, शंकर नाईक, प्रवीण नाईक, अमित कुबल, कौस्तुभ जाधव, लवू गावडे, संभाजी गोवेकर, उषा चव्हाण, वैदेही चव्हाण, रश्मी नार्वेकर, उपस्थित होते. यावेळी नूतन जिल्हा अध्यक्ष रामदास तेंडोलकर यांनी कामगार यांच्या प्रश्नांसाठी मी सदैव आपल्या पाठीशी आहे आपण सर्वजण असेच एकत्र होऊन काम करुया आज ४० जन एकत्र झालोत लवकरच येणाऱ्या काळात संघटना भक्कम पने बांधणी करून त्याचे ४० पदाधिकारी यांचे ४०० कसे होतील यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करूया व कामगार वर्गाला येणाऱ्या अडिअडचणी यांना आपण सर्वजण मिळून तोंड देऊ व प्रश्न सोडवू असे सांगितले. यावेळी श्रमिक बांधकाम कामगार संघटना ही कामगार वर्गाचे प्रश्न सोडविण्यासाठी कायम अग्रेसर असते व सोडविते असे गौरोद्गार कामगार वर्गामधून काढण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा