*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री विद्या रानडे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*कथा श्रीराम जन्मभूःमीची ।*
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
ऐका कथा श्रीरामजन्मभूमिची
श्रीराम जय राम जय जय राम ।
आयोध्या नगरीत भव्य मंदिर होते प्रभू श्रीरामांचे ।
जन्मभूमी रामांची मंदिर रामलल्लाचे
श्रीराम जय राम जय जय राम
सोळाव्या शतकात सव्वीसाव्या वर्षी
एक क्रूर आक्रमक दिन दिन करत आला
आला मोठा त्वेषाने लढला।
राणा संग्राम सिंह त्यास भिडला
घनघोर युद्ध अन बाबर पराजित झाला
श्रीराम जय राम जय जय राम।
पुन्हा आक्रमण, रणकंदन माजले
दुर्दैव रामभक्तांचे या समयी बाबराने जिंकले ।
सुंदर मंदिर होते प्रभुरामांचे
आदेश सेनापती मीर बांकीस
उद्ध्वस्त करणे मंदिर अन बांधा मशिदीस
श्रीराम जय राम जय जय राम।।
संघर्ष सुरूच राहिला, प्रत्येक रामभक्त लढला
लढता लढता मेला, स्वर्ग प्राप्त केला
रक्ताने भूमी भिजली;
लढता लढता मरण्याची शपथ भक्तांनी घेतली
विद्या रानडे