*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री माया कारगिरवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
!! *काहूर*!!
काहूर वेदनांचे उरात साठले
ज्याच्यासाठी जगले होते
तेच जीवावर उठले
ज्यासाठी निरांजन तेवले होते…!
वेदनेलाहीअंत असतो
षंढ प्रवृत्तीला कधी च कळले नाही..
अहंकाराच्या वणव्यात सुंदर आयुष्य
कसे जळाले त्या मनोवृत्ती ला कळले नाही….
सर्वस्वाची समिधा अर्पण करुन
कर्तव्याच्या खाणी उपसले
खुज्या मनोवृत्ती ने शेवटी
अवहेलनेचेच छंद जोपासले…
वेदनांची धग अजून ही
मनात लसलसते आहे
षंढांच्या वेढ्यातील स्त्री
कडेलोटाची वाट बघते आहे.
सौजन्याचे बुरखे पांघरूण
षंढ समाजात फिरतो आहे,
बंधनांच्या चौकटीत ती
आजही झुरते आहे….!!
काळोख वेदनेचा गडद
होत चालला हो आता
राखेतून स्वत्वाचा फिनिक्स होतो आहे
अंधारलेल्या वाटेवरून जाता….
स्वप्नपूर्ती आणि ध्येयासाठी
मिळतील का .? काजवे यशाचे
या उतरणी च्या तिमीरात
देईल कां तिला कोणी दिवे तेजाचे..!!!
माया कारगिरवार.