You are currently viewing सेंट जोसेफ महाविद्यालयात उद्योजकता प्रशिक्षण संपन्न

सेंट जोसेफ महाविद्यालयात उद्योजकता प्रशिक्षण संपन्न

*सेंट जोसेफ महाविद्यालयात उद्योजकता प्रशिक्षण संपन्न*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

शनिवार, दिनांक ११ जानेवारी २०२५ रोजी ज्ञानदीप मंडळ संचलित सेंट जोसेफ कला आणि वाणिज्य महाविद्यालय, सत्पाळा, विरार (पश्चिम) यांच्या सेल्फ फायनान्स विभागाच्या वतीने ‘उद्योजकता प्रशिक्षण अर्थात Enterpreneural Talk Show’ चे आयोजन करण्यात आले होते. वसई विरार मधील प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय विल्फ्रेड डिमोंटि आणि जॉय डायस यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. कविता आल्मेडा यांनी सांगितले, की उद्योगात आपण जितका जास्त धोका पत्करू तितका नफा जास्त कमवितो.

प्रसिद्ध उद्योजक विल्फ्रेड म्हणाले, “कोणताही व्यवसाय यशस्वी होण्यासाठी आणि नफा कमवण्यासाठी प्रयत्न अत्यंत महत्त्वाचे असतात. व्यवसायामध्ये संघर्ष, सातत्य आणि आत्मविश्वासाची नितांत गरज असते.” सदर कार्यक्रमात बोलताना प्रसिद्ध उद्योजक जॉय डायस म्हणाले, “व्यवसायातील उज्वल यशासाठी आणि भवितव्यासाठी तुमचा जनसंपर्क दांडगा असायला हवा. प्रत्येक ग्राहकाला भगवान मानता यायला हवे.” कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि उद्योजकांचे स्वागत सेल्फ फायनान्स कॉर्डिनेटर डॉ. दीपा लोपीस यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सबिना कोरीया आणि आभार प्रदर्शन अलिशा तुस्कानो यांनी केले. सदर कार्यक्रमास आई क्यू एसी कॉर्डिनेटर डॉ. विन्सेंट डिमेलो, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सुभाष डिसोजा आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सेल्फ फायनान्स विभागाच्या सर्व प्राध्यापकांनी अथक परिश्रम घेतले.

_____________________________
*संवाद मिडिया*

प्रिय पालक आणि विद्यार्थी,
आपल्या रत्नागिरीत पहिल्यांदाच फक्त *JEE आणि CET* परीक्षांच्या उत्कृष्ट तयारीसाठी सुवर्णसंधी!

*आता कोकणातील एकमेव IITian शिक्षक म्हणजेच राजवाडे सरांच्या च्या मार्गदर्शनाखाली विशेष बॅच सुरू होत आहे.*
✅ तज्ज्ञ मार्गदर्शन: IIT JEE / CETचे अनुभव आणि यशस्वी तंत्रशुद्ध अभ्यास पद्धती
✅ व्यक्तिगत लक्ष: प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रगतीवर विशेष भर
✅ नवीनतम अभ्यासक्रम: JEE आणि CET साठी अद्ययावत नोट्स आणि टेस्ट सिरीज
✅ आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर: सुलभतेने शिकण्यासाठी डिजिटल साधने
आता आपल्या मुलाचे स्वप्न IIT किंवा उत्कृष्ट अभियांत्रिकी कॉलेजमध्ये जाण्याचे पूर्ण करा!
स्थाने आणि नोंदणीसाठी आजच संपर्क साधा:
📞 9653348536/9421141980
📍 [यश सिद्धी क्लास, शिर्के प्लाझा]
शिकण्याचा नवीन दृष्टीकोन आणि प्रेरणादायक वातावरणाची हमी!
सीमित प्रवेश – आजच नोंदणी करा!
“यश तुमच्या मुलाच्या भविष्याचा पाया होईल!”

*Advt
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा