You are currently viewing इंडियन पोलीस मित्रमंडळाच्या जिल्हाअध्यक्ष पदी गजानन जाधव यांची नियुक्ती

इंडियन पोलीस मित्रमंडळाच्या जिल्हाअध्यक्ष पदी गजानन जाधव यांची नियुक्ती

बुलढाणा :

डि.एस. राठोड फाऊंडेशन व मार्शल योगा अकॅडमी संचलीत, इंडियन पोलीस मित्र या सामाजिक संस्थेच्या जिल्हाअध्यक्ष पदी अंचरवाडी ता. चिखली जि बुलढाणा यांची निवड मुख्य अधिकारी महाराष्ट्र पोलीस मित्र, डॉ. सुरेश राठोड आणि महासंचालक डॉ. कृष्णा देवगीरी यांनी एका नियुक्ती पत्राव्दारे केली आहे.

गजानन जाधव हे सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असून पोलीस आणि समाज समस्या, यांच्यात समरसता व्हावी गुहेगारी कमी व्हावी तसेच समुपदेशन या हेतूने इंडियन पोलीस मीत्र काम करीत असून महाराष्ट्रात हे काम सुरु असून प्रत्येक जिल्ह्यात शाखा आहेत. गजानन जाधव हे सामाजिक कार्यकर्ते असून चित्रपट कलावंत असून चित्रपट लघुपट सिरीयल मध्ये भूमिका केल्या आहेत. तसेच नाट्य कला, सांस्कृतिक कार्यक्रम करीत आहेत. त्यांच्या या निवडीमुळे त्यांच्यावर मित्रमंडळी गावकरी यांच्या कडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा