*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*चहाचा.. आमचा अड्डा !!*
मनाचा कोंडाळा फोडण्याकरता
चहाचा आमचा अड्डा होता
स्नेहपाशाचा व्यहवार दुय्यम ठरला
जगण्याचा आनंद दुसरा उरला नव्हता
कर्म उधारीचं !जेव्हा वसुलीला येत
त्यावेळी कुणाचाचं वशिला चालत नाही
हरएक खिश्यातून चंदा जबरन गोळा केल्याशिवाय ..
अड्ड्यावर चहा घश्याखाली उतरतं नाही….!!
थोडासा वेडेपणा जगण्यात वारेमाप करत गेलो….अड्ड्यावर..
नकली सभ्यपणा आमचा आनंद हिरावून घ्यायचा…..
अड्ड्यावरची संगत कशी का असेना
नात्याची घट्ट वीण वाफाळलेला चहाचं जोडायचा….
विधिलिखित अटळ रेषा अड्ड्यावर
किल्लीने !चहाच्या टेबलावर खरडल्या
आयुष्याची गुरूकिल्ली इथेच सापडली
मैत्रीखातर इथेच आमच्या मुठी वळल्या
मुक्या माराचे बोलके डाग आम्ही जपले
कपड्यावरचे चहाचे डाग निघाले नाही
अनंत शक्यतेचा भास अड्ड्याने दिला
कपाला बिलगलेली बोटं कधी सुटली नाही…..
चहाचा आमचा अड्डा ! आजही सुटला नाही.. सुटणारं नाही…!!
अड्ड्यावर गेल्याशिवाय वाफाळलेलं
जगणं पूर्ण होत नाही..!!
अजून एक कट हवा!फूल नाही !!
बाबा ठाकूर