दोडामार्गातील कला-कौशल्य संगीत विद्यालयाचे उद्या उद्घाटन…
दोडामार्ग
येथील सांस्कृतिक लोककला मंच यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या कला-कौशल्य संगीत विद्यालयाचा उद्घाटन सोहळा उद्या सकाळी १० वाजता संजय सुतार यांच्या निवासस्थानी, झरेबांबर विमानतळ येथे आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याचे उद्घाटन उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते गंगाराम कोळेकर यांच्या हस्ते होणार आहे.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून झरेबांबर सरपंच अनिल शेटकर व आनंद ठाकूर यांची उपस्थिती लाभणार आहे. तरी सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सांस्कृतिक लोककला मंच अध्यक्ष शंकर जाधव, उपाध्यक्ष महादेव सुतार, सचिव सागर नाईक, सहसचिव विलास आईर, खजिनदार महेश पारधी, सहखजीनदार संदीप जाधव, सल्लागार प्रकाश वर्णेकर, कार्याध्यक्ष संजय गवस, संजय सुतार, सदस्य शांताराम बेनकर देविदास सुतार यांनी केले आहे.