You are currently viewing श्रीराम मंदिर प्रथम वर्धापनदिन तथा वर्षपुर्ती सोहळ्या निमीत्त वेंगुर्लेत राममंदिरांत आयोजित महाआरतीस रामभक्तांचा उस्फूर्त प्रतिसाद

श्रीराम मंदिर प्रथम वर्धापनदिन तथा वर्षपुर्ती सोहळ्या निमीत्त वेंगुर्लेत राममंदिरांत आयोजित महाआरतीस रामभक्तांचा उस्फूर्त प्रतिसाद

*श्रीराम मंदिर प्रथम वर्धापनदिन तथा वर्षपुर्ती सोहळ्या निमीत्त वेंगुर्लेत राममंदिरांत आयोजित महाआरतीस रामभक्तांचा उस्फूर्त प्रतिसाद* .

*ह.भ.प.सावळाराम कुर्ले महाराजांच्या हस्ते श्रीरामाच्या प्रतीमेचे पुजन*

श्रीराम मंदिर प्रथम वर्धापनदिन तथा वर्षपुर्ती सोहळ्यानिमित आज शनिवारी 11 जानेवारी रोजी वेंगुर्ले येथील श्रीराम मंदिरात हिंदुधर्माभिमानी मंडळी व चैत्र रामनवमी सप्ताह ग्रुप च्या वतीने
रामनाम नामस्मरण करुन कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. अयोध्येतील भव्य श्रीराम मंदिराचे उद्घाटन आणि रामलला स्वरूपातील मूर्तीची प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारी २०२४ या दिवशी संपन्न झाली व अयोध्या नगरीत प्रभू श्रीरामचंद्र विराजमान झाले. अत्युच्च आनंदाचा हा सोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारा होता. समस्त देशवासीयांचे स्वप्न या दिवशी साकार झाले. अयोध्या येथे संपन्न झालेल्या आनंदी सोहळ्याला आता वर्ष पूर्ण झाले आहे. या वर्षपूर्ती निमित्त समस्त हिंदुधर्माभिमानी मंडळी व श्री रामभक्तांच्या वतीने वेंगुर्ले श्रीराम मंदिर येथे आज
विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सकाळी नामस्मरण , तीन वेळा रामरक्षा, करुणाष्टक, पसायदान आदी धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले .
सायंकाळी ह.भ.प.सावळाराम कुर्ले महाराज यांच्या हस्ते श्रीरामाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून महाआरती करण्यात आली. यावेळी वारकरी संप्रदायातील मंडळी व रामभक्त उस्फूर्त पणे सहभागी झाले होते .

प्रतिक्रिया व्यक्त करा