आ.निलेश राणे यांची महाराष्ट्र सागरी मंडळाला भेट
मुंबई :
एकीकडे मंत्री नितेश राणे यांनी कोकण किनारपट्टीवरील सागरी सुरक्षेची ढाल हाती घेतली आहे.तर दुसरीकडे आमदार निलेश राणे यांनी सागरी किनारपट्टीवरील पर्यटन वाढीसाठी पुढाकार घेतला आहे.एकूणच दोन्ही राणे बंधू कोकणच्या विकासासाठी महत्वपूर्ण निर्णय घेत कोकणाला एक नवे विकसित अस्तित्व देण्याच्या प्रयत्नात आहेत.
आज आ.निलेश राणे यांनी महाराष्ट्र सागरी मंडळ (मेरिटाइम बोर्ड) ची भेट घेतली असून त्यांच्या अधिकाऱ्यांसोबत मुंबई येथे बैठक पार पडली या बैठकीत देवबाग संगम येथे अत्याधुनिक पद्धतीचा ‘ग्रोयसं’ बंधारा उभारनी करणे, पर्यटणवाढीसाठी मालवण जेट्टी ते दांडी पर्यंत मरीन ड्राईव्हच्या धर्तीवर पर्यटकांच्या सुविधेसाठी प्रॉमिनाड्स बांधकाम करणे आणि इथून पुढे भविष्याच्या गर्दीचा अंदाज घेऊन फक्त बंधारा नाही तर रस्ता कम बंधारा असं काम हाती घेतलं पाहिजे असं ठरवण्यात आलं. यावेळी या कामांसंदर्भात तसेच इतर अनेक प्रलंबित व प्रस्तावित विकासकामांबाबत सकारात्मक चर्चा झाली.