*पिंपरी न्यायालयात नव्याने रुजू सहायक सरकारी वकिलांचे ॲडव्होकेटस् बारच्या वतीने स्वागत*
पिंपरी
गुरुवार, दिनांक ०९ जानेवारी २०२५ रोजी पिंपरी न्यायालयात नव्याने रुजू झालेल्या सहायक सरकारी वकिलांचा पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनच्या वतीने फुलांचे रोपटे देऊन स्वागत आणि सन्मान करण्यात आला. पिंपरी न्यायालयात सहाय्यक सरकारी वकील म्हणून ॲड. पूजा काळे, ॲड. पूजा इंगळे, ॲड. प्राजक्ता पिसाळ, ॲड. क्रांती कुरळे व ॲड. रूपाली साखरकर हे नव्याने रुजू झाले आहेत. यावेळी बोलताना, ‘सरकारी वकील म्हणून काम करीत असताना एकीकडे जनतेचा रोष, तर दुसरीकडे सरकारी उत्तरदायित्व अशी दुहेरी जबाबदारी पार पाडायची असते़. सरकारची बाजू मांडत असतानाच पीडितांना न्याय कसा मिळेल यासाठी सरकारी वकिलाने आपल्या कायद्याच्या ज्ञानाचा उपयोग करावयाचा असतो!’ असे मत अध्यक्ष ॲड. गौरव वाळुंज यांनी व्यक्त केले. यावेळी बारचे माजी अध्यक्ष ॲड. सुशील मंचरकर, माजी उपाध्यक्ष ॲड. दत्ता झुळुक, ॲड. संगीता परब, सहायक सरकारी वकील ॲड. शेख मॅडम, ॲड. रामहरी कसबे, ॲड. गजेंद्र तायडे, ॲड. शंकर पल्ले, ॲड. गणेश राऊत, ॲड. अजिंक्य मराठे, ॲड. अतुल कांबळे, ॲड. अनिल शेजवानी, ॲड. भोंडे, ॲड. अनिल डांगे, ॲड. प्रशांत बचुटे आणि वकील बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. गौरव वाळुंज, सचिव ॲड. उमेश खंदारे, महिला सचिव ॲड. रिना मगदुम, खजिनदार ॲड. अक्षय फुगे, सदस्य ॲड. संकेत सरोदे, सदस्य ॲड. विकास शर्मा यांनी केले. सूत्रसंचालन सचिव ॲड. उमेश खंदारे यांनी केले; तर आभार ॲड. अक्षय फुगे यांनी मानले.
– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२