You are currently viewing श्रीकांत

श्रीकांत

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री पल्लवी उमेश लिखित अप्रतिम लेख*

*श्रीकांत*

काल netflix वर सहज सर्च करत असताना, श्रीकांत हा मुव्ही दिसला…राजकुमार राव आहे म्हणून बघायला सुरुवात केली. आणि त्यात अडकतच गेले .
साधी सरळ गोष्ट पण त्याकडे बघायचा दृष्टिकोन आपल्याला बदलायला भाग पाडणारा हा उत्कृष्ठ असा सिनेमा आहे.

श्रीकांत हा २०२४ मधील हिंदी भाषेतील चरित्रात्मक चित्रपट आहे. हा चित्रपट बोलंट इंडस्ट्रीजचे संस्थापक श्रीकांत बोला यांच्या आयुष्यावर आधारित आहे. मुख्य भूमिकेत राजकुमार राव आहे. हा नायक प्रधान चित्रपट असून राजकुमार राव ने कमाल केलीय…मला त्याच्या आत्ता पर्यंतच्या चित्रपट कारकिर्दी पहाता, हा त्याचा सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणलं तर वावगे ठरणार नाही. त्याने साकारलेली भूमिका अक्षरशः तो जगाला आहे…अंध मुलांचे हावभाव ,हालचाली याचा खूप बारकाईने त्याने अभ्यास केलेला जाणवतो.

एका जन्मांध मुलावर आधारित हे कथानक आहे.तसे तर आपल्या आजूबाजूला अनेक अंध मुळे आपण बघत असतो…त्यांची किव येते, बिचारे म्हणतो…त्यांना थोडी मदत करू पाहतो….पण हे त्यांना कितपत आवडते किंवा आवडत नाही….हे आपल्याला हा चित्रपट पाहून आपले अंध डोळे उघडायला भाग पाडतो.
यात एकच गाणे आहे ते ही अतिशय सुश्राव्य.

यात नायिकेला फारसे महत्व नाही …यात. आलिया फर्निचरवाला (F), ज्योतीका आणि शरद केळकर यांनी ही आपापल्या भूमिका उत्कृष्ठ केल्या आहेत..
एकवेळ अवश्य हा चित्रपट पहावा असा आहे. Netfix
वर उपलब्ध आहे.

जरूर एकदा पहा.
,…………………………………………………………
© पल्लवी उमेश
जयसिंगपूर

प्रतिक्रिया व्यक्त करा