*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा साहित्य प्रेरणा कट्टा आजगाव समुहाचे सदस्य कवी सोमा चंद्रकला चंद्रकांत गावडे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*संकल्पाचे ठायी चिरंजीविता*
मम झाला कालनिर्णय
मी झाले आहे भूतकाल |
मी उरले स्मरणमात्रे
ठरले गतवर्षकाल ||१||
ज्यांनी केले कार्य सुंदर
त्यांच्याचपायी त्यांच्यासाठी |
कर्तृत्वहित हो सुधीर
स्मृती मी त्या अमृतांसाठी ||२||
उरले नुरले तरीही
सर्वांसाठी दिवस खास |
एक जानेवारी आणिक
एकतीस डिसेंबरास ||३||
सरत्याचा शेवट छान
रिघत्याचा प्रथम मान |
केले संकल्प निभावले
नवे यति जन्म पावले ||४||
आज एक नवा संकल्प
प्रत्येकाने करावयाचा |
समान नागरिक मान
हिंदुस्थानी पाळावयाचा ||५||
धर्म जात असोत प्यारे
अंध प्रिती सोडून द्यारे |
मानवतेच्या संस्कृतीचे
जीव मोल तोलून घ्यारे ||६||
देश माझा अन् मी देशाचा
प्रत्येकाच्या भाव मनीचा |
शुद्ध चिरंतन राखावा
अखंड देश सन्मानाचा ||७||
कवी :- श्री सोमा चंद्रकला चंद्रकांत गावडे.
फणसखोल, आसोली, ता. :- वेंगुर्ला,
जि. सिंधुदुर्ग, राज्य :- महाराष्ट्र