You are currently viewing सिंधुदूर्ग जिल्ह्यातील दिव्यांग बांधवाना मोफत साहित्य वाटप

सिंधुदूर्ग जिल्ह्यातील दिव्यांग बांधवाना मोफत साहित्य वाटप

*सिंधुदूर्ग जिल्ह्यातील दिव्यांग बांधवाना मोफत साहित्य वाटप*

सिंधुदूर्ग

जिल्हा दीव्यांग पुनर्वसन केंद्र सिंधुदूर्ग एलिम्को व जिल्हा प्रशासन आरोग्य विभाग सिंधुदूर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने ADIP योजनेअंतर्गत सहाय्यभूत साहीत्य वाटप.

दि. ३ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर २०२४ रोजी दरम्यान घेण्यात आलेल्या शिबिराच्या अनुषंगाने
दिनांक ६ /१/ २०२५ ओरोस येथे कुडाळ व मालवण या तालुक्यातील दीव्यांग बांधवांना आंबेडकर भवन येथे साहित्य वाटप करण्यात आले.
७/१/२०२५ नांदगाव आरोग्य केंद्र येथे देवगड, कणकवली, वैभववाडी या तालुक्यातील दिव्याग बांधवांना साहित्य वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास PAC कर्मचारी व सहकारी यांनी उत्कृष्ट सहाय्य केले.
८/१/२०२५ बांदा आरोग्य केंद्र येथे वेंगुर्ला, दोडामार्ग, सावंतवाडी या तालुक्यातील दीव्यांग बांधवांना साहित्य वाटप करण्यात आले.
हे साहित्य उत्कृष्ट दर्जाचे होते. साहित्य घेताना दिव्यांगाच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. या कार्यक्रमास अमूल्य असे योगदान समांजकल्याण अधिकारी मनोज बहीरे, कणकवली पं. स. बीडिओ मा. अरुण चव्हाण, प. स.साय.कुडाळ बीडीओ श्याम चव्हाण, नांदगाव PAC Dr. तृप्ती देसाई व त्यांचे सर्व कर्मचारी, बांदा PAC Dr. सारंग, सामजिक कार्यकर्ते बाळा बोर्डवेकर, संजय देसाई, सुनिल तांबे आणि DDRC चे सर्व कर्मचारी आदीचे सहकार्य लाभले. व अलिमको कंपनीचे अभिलाषा ढोरे, व त्यांचे कर्मचारी, यांच्या सहकार्याने कार्यक्रम संपन्न झाला. या वेळी ६९५ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा