You are currently viewing भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी ऑनलाईन पध्दतीने नोंदणी करण्याचे आवाहन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी ऑनलाईन पध्दतीने नोंदणी करण्याचे आवाहन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी ऑनलाईन पध्दतीने नोंदणी करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी

जिल्हा व तालुका ठिकाणातील परिसरात असलेल्या महाविद्यालयातील इ.11 वी व इ.12 वी तसेच इयत्ता 11 वी व 12 वी नंतरच्या व्यावसायिक, बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून सन 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांनी https://hmas.mahait.org  या पोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने  दि. 15 जानेवारी 2025 अखेर नोंदणी करण्याचे आवाहन समाज कल्याण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे.

             या योजनेचा लाभ घेण्यासाठी अटी व शर्ती पुढीलप्रमाणे, विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा. विद्यार्थी हा अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील असावा,विद्यार्थी हा जिल्हा व तालुका ठिकाणातील परिसरात असलेल्या महाविद्यालयातील इ.11 वी, 12 वी तसेच 11 वी व 12 वी नंतरच्या व्यावसायिक, बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेशित असावा. विद्यार्थ्यास मागील अभ्यासक्रमास 50 टक्यापेक्षा जास्त गुण असावेत. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ही मर्यादा 40 टक्के इतकी राहील. जिल्हानिहाय अनुसूचित जाती लोकसंख्येच्या प्रमाणात किती विद्यार्थ्यांना लाभ द्यावयाचा आहे ही संख्या निश्चित केली आहे. त्यामुळे जास्त संख्येने अर्ज सादर झाल्यास गुणवत्तेनुसार निवड करण्यात येईल.

            या योजनेची माहिती www.maharashtra.gov,in या संकेतस्थळावर असून शासन निर्णयात या योजनेविषयीच्या अटी व शर्तीची माहिती उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहे. तरी  अनु.जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी स्वाधार योजनेचे अर्ज ऑनलाईन पध्दतीने पोर्टलवर भरुन अर्जाची PDF व शैक्षणिक आवश्यक कागदपत्रांसह  नजीकच्या मुलांचे, मुलींचे शासकीय वसतिगृह, महाविद्यालय व सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय येथे समक्ष किंवा टपालव्दारे परिपूर्ण अर्ज सादर करावेत. संबंधित महाविदयालयांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेबाबत पात्र विदयार्थ्यांना योजनेचा लाभ घेण्याबाबत कळविण्यात यावे. अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग (०२३६२-२२८८८२) यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा