दोन वेगवेगळ्या अपघातात तीन जण जखमी
सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते रवी जाधव व रूपा मुद्राळे यांनी केली मदत कार्य.
सावंतवाडी
संध्याकाळी पाच च्या सुमारास जेल जवळ झालेल्या अपघातात दोन व्यक्ती जखमी झाले त्यामध्ये माडखोल येथील अनंत राऊळ 23 तर शंकर चव्हाण 74 या दोन व्यक्तींच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली तर चव्हाण यांना बांबुळी मध्ये पाठवण्यात आले.त्याच पाठोपाठ सायंकाळी सात वाजता माजगाव येथे एका अपघातात उद्देश हजारे 74 गंभीर जखमी त्यांनाही गोवा बांबुळी येथे पाठवण्यात आले.
या दोन्ही अपघातात सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या कार्यकर्ते रवी जाधव, रूपा मुद्राळे व संतोष गावकर मदत कार्य केले त्यावेळी त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचे आभार मानले.