You are currently viewing सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानकडून सुतिकागृह व कुटीर रुग्णालयातील रुग्णांसाठी दिली 50 ब्लॅंकेट्स 

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानकडून सुतिकागृह व कुटीर रुग्णालयातील रुग्णांसाठी दिली 50 ब्लॅंकेट्स 

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानकडून सुतिकागृह व कुटीर रुग्णालयातील रुग्णांसाठी दिली 50 ब्लॅंकेट्स

सावंतवाडी

थंडीचे प्रमाण वाढल्या कारणाने थंडीपासून रुग्णांचा बचा होण्याकरिता सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान व राजधानी ट्रॅव्हलर्सचे ट्रॅव्हलर्स एजन्सी चे मालक शोभन भाई यांच्या संयुक्त विद्यमनाने राणी जानकीबाई सुतिका गृह व उपजिल्हा रुग्णालयात एकूण 50 ब्लॅंकेट देण्यात आली.
राजधानी ट्रॅव्हल्स एजन्सी चे मालक शोभन भाई यांनी सदर ब्लॅंकेट संस्थेची सचिव समीरा खलील यांचे पती आमीन खलील यांच्याजवळ सुपूर्त केले होते.
या कार्यक्रमाप्रसंगी राणी जानकीबाई वैद्यकीय संस्थेचे डॉ. राजेश गुप्ता,प्राचार्य डॉ.संजय दळवी, डॉक्टर नंददीप चौडणकर, सिस्टर करुणा गावडे, सुशील राऊळ तसेच उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ.सागर जाधव, सिस्टर विजया उबाळे मेट्रन , पी पी राणे इन्चार्ज सिस्टर व श्रीमती पटवारी मॅडम उपस्थित होते. तसेच सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीश बागवे, उपाध्यक्ष शैलेश नाईक कार्याध्यक्ष संजय पेडणेकर, सचिव समीरा खलील, रवी जाधव, रूपा मुद्राळे, अशोक पेडणेकर,हेलन निबरे, शाम हळदणकर, शरदनी बागवे आम्हीं खरील व समिता सावंत उपस्थित होते.
सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान व राजधानी एक्सप्रेस ट्रॅव्हल्स एजन्सी चे मालक शोभन भाई यांचे उपस्थितानी कौतुक करून त्यांचे आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा