*कोकण इतिहास परिषदेचे १ फेब्रुवारी रोजी मुंबई येथे अधिवेशन*
वैभववाडी
कोकण इतिहास परिषदेचे १४ वे वार्षिक राष्ट्रीय अधिवेशन शनिवार, १ फेब्रुवारी,२०२५ रोजी सकाळी ८.३० ते संध्याकाळी ५.३० यावेळेत मुंबईतील माटुंगा येथील रुपारेल महाविद्यालयात आयोजित केले आहे. ज्येष्ठ इतिहासकार आणि मानववंश शास्त्रज्ञ डॉ. कुरूष दलाल हे अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषविणार आहेत. तसेच अधिवेशनात ज्येष्ठ इतिहास आणि पुरातत्त्व संशोधक डॉ. अरविंद जामखेडकर यांना यंदाचा जीवनगौरव पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
या परिषदेत कोकणातील आदिम ते आधुनिक नागर संस्कृतीचा इतिहास या विषयावर शोधनिबंध सादर केले जाणार आहेत. त्याचप्रमाणे १ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२५ या वर्षभरात प्रसिद्ध झालेल्या कोकणावरील संशोधन ग्रंथास रोख पुरस्कार आणि मानपत्र देण्यात येईल. शोधनिबंध ग्रंथाचे प्रकाशनही या अधिवेशनात मान्यवरांच्या हस्ते होईल. त्याचप्रमाणे गेल्या वर्षी अधिवेशनात सादर झालेल्या दोन उत्कृष्ट शोधनिबंधांना पारितोषिके देण्यात येतील अशी माहिती कोकण इतिहास परिषदेचे अध्यक्ष श्री. सदाशिव टेटविलकर यांनी दिली. यावेळी
रुपारेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप म्हस्के, इतिहास विभाग प्रमुख डॉ. अरविंद गणवीर, डॉ. रेखा गोरे आणि कोकण इतिहास परिषदेच्या कार्यवाह डॉ.
विद्या प्रभू, कोषाध्यक्ष प्रा.भारती जोशी, श्री.प्रविण कदम हे
पदाधिकारी उपस्थित होते. कोइप च्या १४ व्या वार्षिक राष्ट्रीय अधिवेशनाला जिल्ह्यातील प्राध्यापक, संशोधक, अभ्यासक व इतिहासप्रेमींनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी प्रा.एस.एन.पाटील (9834984411),
श्री.प्रविण पारकर (9420822553), श्री.रणजित हेर्लेकर (9423303670) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन कोइप सिंधुदुर्ग जिल्हा शाखेने केले आहे.