You are currently viewing आयुष्याची डायरी

आयुष्याची डायरी

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ.कविता किरण वालावलकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*आयुष्याची डायरी*

 

आयुष्याच्या डायरीच

पान जेव्हा उघडलं

प्रतिबिंब काळजाचे

जणू प्रेमात दिसलं

 

चाळताना एक एक

पान माझ्या डायरीचं

गेलं ते उलगडत

गूढ रहस्य प्रितीचं

 

एकांताच्या अंधारात

माझ्या सोबत डायरी

बिलगली काळजाला

चिंता आयुष्याची जरी

 

अशी आयुष्य डायरी

शिकवते जगायला

जणू खऱ्या नात्यातले

मर्म मनी पेरायला

 

सौ कविता किरण वालावलकर

दावणगिरी , कर्नाटक

प्रतिक्रिया व्यक्त करा