पुणे :
केळवद जि बुलढाणा येथील सुप्रसिद्ध ग्रामिण कवी, साहित्यिक, मनोहर पवार यांनीआंतरराष्ट्रीय फुले फेस्टीवल पुणे येथे काव्य संमेलनात बुलढाणा जिल्हयातून सहभाग नोंदविला. यात सावित्रीमाई फुले जन्मऊत्सवा निमित्ताने जागतिक पातळीचे ६०० कवींनी सहभाग नोंदविलात्यामध्ये, दुबई, केरळ, आध्र, तामिळ, दिल्ली, आणि विविध राज्यातून मराठी आणि सत्यशोधक फुले प्रेमींनी सहभाग नोंदविला.
या अभूतपूर्व महासंमेलनाचे आयोजक भिडेवाडा कार, विजय वडवेराव यांनी सदर कार्यक्रमाचे आयोजन केले. त्यात सावित्रीमाई फुले फातीमा बी,तसेच लहूजी साळवे, महात्मा फुले यांच्या जीवन कार्यावर संघर्षावर आधारीत नाट्य, एकपात्री, अभिनय, काव्य वाचन, तसेच, गझल, पोवाडे, कट्टा दांडपट्टा, जुदो कराटे, आदी कलांचे प्रात्याक्षिक करण्यात आले . सहभोजन, आणि स्नेहमिलन कार्यकम झाला. ८० वर्षांच्या वयस्कर आजीपासून ते १५ वर्षांच्या मुली पर्यंत सर्वांनी सहभाग नोंदविला . सर्वांना भारताचे संविधान व स्मृती चिन्ह तसेच आकर्षक समान चिन्ह प्रदान करण्यात आले. एस. ए म. जोशी सभागृहात (पूणे) रंगलेले हे फुले फेस्टिवल जागतिक उंचीचे ठरले. कारण सतत पाच दिवस अखंड काव्य ज्योत पेटलेले हे देशातील पहिले संमेलन नोंद झाली. सावित्रीच्या वेषात सभागृह भरून उरले . क्रांती ज्योत पेटविणारे भिडेवाडाकार विजय वडवेराव यांनी स्वयंस्फूर्तीने व्यक्तीगत खर्चाने कुठलेही प्रवेश शुल्क न घेता कार्यक्रम आयोजित करीत जागतिक विक्रमच केला. याच कार्यक्रमात बुलढाणा जिल्ह्यातील कवी मनोहर पवार यांनी सावित्री माय वर
सुंदर, भिडे वाडयात वाडयात । पहिली मुलींची शाळा ।
कसा फुलविला । शिक्षणाचा मळा ॥
ही अत्यंत प्रभावी सुंदर रचना सादर करून क्रांती जागर केला. दाद मिळवली. या आंतराष्टीय काव्य संमेलनात मला रुहभागी होता आले हे मी माझे भाग्य व बहुमान समजतो असे सांगीतले. कवी शाहीर, मनोहर पवार हे सातत्याने काव्य लेखन करणारे आणि संपूर्ण महाराष्ट्रभर काव्य वाचन करणारे बहुचर्चित कवी ठरले आहेत. त्यांच्या बरोबर कवी संजय हिवाळे, अशोक मोहीते, डॉ. मंजुराजे जाधव, पंढरीनाथ शेळके, तसेच निवृती जाधव, अनिल नाटेकर येळगांवकर, सौ सुवर्णा पवार, इत्यादींनी निमंत्रीत कवी म्हणून सहभाग नोंदविला.