अन्नपूर्णा टेक् सोर्स व अन्नपूर्णा गो सोर्स च्या दुसऱ्या टप्प्याच्या विस्तारास आनंद वरक यांनी दिल्या शुभेच्छा
सिंधुदुर्गातील जास्त जास्तीत जास्त बेरोजगार तरुणांनातरुणांना रोजगार देण्याची शिवसेना शिंदे गटाच्या भटक्या विविध संघटना सेलचे तालुकाध्यक्ष आनंद वरक यांनी केली विनंती
सावंतवाडी
अन्नपूर्णा टेक् सोर्स व अन्नपूर्णा गो सोर्स या दोन कंपन्यांच्या माध्यमातून सावंतवाडी सारख्या ठिकाणी आयटी इंडस्ट्री स्थापन करून त्याच्या दुसऱ्या टप्प्याचा विस्तार आज सावंतवाडी येथे करण्यात आला. यावेळी या कंपन्यांचे सीईओ अन्नपूर्णा कोरगावकर व संतोष कानसे यांना शिवसेना शिंदे गटाच्या भटक्या विविध संघटना सेलचे तालुकाध्यक्ष आनंद वरक यांनी भेट घेत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सातुळी येथील संतोष कानसे या मुंबई स्थित युवकाच्या संकल्पनेतून या दोन्ही कंपन्यांची वाटचाल सुरू आहे. आयटी कंपन्यांसाठी सावंतवाडी मध्ये कुठलीही पायाभूत सुविधा नसताना अशी कंपनी सुरू करणे हे खरोखरच धाडस ठरेल. व इतर व्यवसायिकांना दिशादर्शक ठरेल असे काम संतोष कानसे व अन्नपूर्णा कोरगावकर यांनी केले आहे. सिंधुदुर्गात यासाठी लागणारे कुशल मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात आहे मात्र अशा कुशल मनुष्यबळासाठी कुठलीही रोजगाराची संधी सिंधुदुर्ग उपलब्ध नसल्याने या युवक युवतींना मुंबई, पुणे, बेंगलोर अशी शहरं गाठावी लागतात. मात्र ज्या गावातून, भागातून आपण जन्म घेऊन यशाची जी शिखरे पादाक्रांत केली त्याच गावात पुन्हा येऊन पुढील पिढीसाठी रोजगार निर्मिती केल्याने संतोष कानसे व अन्नपूर्णा कोरगावकर त्यांचे अभिनंदन आनंद वरक यांनी केले. यावेळी ऐश्वर्या कोरगावकर अखिलेश कोरगावकर,आनंद वरक ,परशुराम लांबर संतोष कानसे तसेच या दोन्ही कंपन्यांचे अमेरिकन व्यावसायिक भागीदार कंपनीतील अधिकारी उपस्थित होते.