You are currently viewing दृष्ट हास्यालाही लागते…!

दृष्ट हास्यालाही लागते…!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*दृष्ट हास्यालाही लागते…!*

 

व्हायचं ते.. होत राहील

अधूनमधून हसून घ्यावं

प्रश्न येतील ..जातील

वेळकाढून हसत राहवं..!

 

अभावाच्या कहाण्या पेरून

कालचा दिनकर.. मावळला

आज नव्याने हसायला

नव्याने सूर्य… उगवला..!

 

दृष्ट हास्यालाही लागते

पेलू नये… अती ओझे

किती सांभाळावे वेदनांना

सदैव राहावे ..ताजे….!

 

घाव संकटाचे क्षणोक्षणी

कशाला मनी ..जपायचे

नकारांना होकार देऊन

मस्तपैकी हसून.. घ्यायचे..!

 

अर्धीच कहाणी सांगून

हास्यालाही शपथ घालावी

मुक्याने गाठ उकलून

पूर्ण कहाणी सांगावी..!

 

अचानक सूर हरवतीलही

हसण्याला ओठांवर मिरवावे

रूसवा ह्दयाचा खुळा

मिश्किल डोळ्यांतून हसावे..!

 

बाबा ठाकूर धन्यवाद

माझी सादरीकरणाची रचना

ठाकूरी उवाच..सात

प्रतिक्रिया व्यक्त करा