You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बीएसएनएल सेवा दर्जेदार बनवा

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बीएसएनएल सेवा दर्जेदार बनवा

मंत्री नितेश राणे यांच्या बीएसएनएल अधिकाऱ्यांना सूचना

कणकवली :

मंत्री नितेश राणे यांनी कणकवली येथे घेतलेल्या बैठकीदरम्यान बीएसएनएलचे मुख्य प्रबंधक श्री जानू यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बीएसएनएल टॉवरची सेवा दर्जेदार देण्यासंदर्भात सूचना केल्या. ग्रामीण भागात ग्रामीण भागातील जनता ही बीएसएनएलच्या टॉवरवर अवलंबून असते संवादासाठी त्यांना इतर पर्याय नसतात त्यामुळे बीएसएनएलने जास्तीत जास्त नेटवर्क दर्जेदार द्यावे आणि संवाद आणि संपर्काची माध्यम म्हणून काम करावे बीएसएनएलच्या अडचणी तातडीने सोडून दर्जेदार नेटवर्क उपलब्ध करून द्यावे अशा सूचना यावेळी मंत्री नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा