You are currently viewing सिंदखेड राजा येथे झाला कासार परिवाराचा सन्मान 

सिंदखेड राजा येथे झाला कासार परिवाराचा सन्मान 

बुलढाणा :

सिंदखेड राजा दि. 4 – बुलढाणा जिल्ह्यातील शिंदखेड राजा या राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जन्म गावी नवी मुंबईचे माजी उपायुक्त व मिशन आय ए एस चे आजीव सभासद श्री महेबूब कासार व त्यांच्या पत्नी श्रीमती परवीन सुलताना यांचा त्यांनी केलेल्या सामाजिक व शैक्षणिक उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मान करण्यात आला. शिंदखेडा राजा येथे जिजाऊ सृष्टीच्या बाजूला असलेल्या राष्ट्रीय एकात्मता व सर्व धर्म भाव याला वाहिलेल्या अल्हाज असद बाबा मेमोरियल ट्रस्ट तर्फे ऊस शरीफ और निशान या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुस्लिम धर्मगुरू श्री मौलाना रिजवी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी देवेंद्र भाई जैन साधक मुंबई, भृगु पीठाधीश्वर दिल्लीचे, महाराज स्वामी सुशील गोस्वामी, डॉक्टर रमाकांत देशपांडे, मिशन आय ए एस चे संचालक प्रा.डॉ. नरेशचंद्र काठोळे, अमेरिकेचे राजदूत डॉ. सोमशेखर, बुलढाणा अर्बनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सुवेंझ झंवर, मुंबईच्या सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती शेख, डॉ. रमाकांत देशपांडे, तसेच कोरिया इंडोनेशिया येथून आलेले एडी वांदियो व दक्षिण कोरियाचे राजदूत सुकी पार्क प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते. श्री व सौ कासार यांनी सामाजिक शैक्षणिक कार्य केलेल्या भरीव योगदानाबद्दल सौ परवीन सुलताना यांना अल्हाज असत बाबा मेमोरियल वुमन आयकॉन अवॉर्ड देऊन कोरियावरून आलेल्या पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. तर जीएसटी चे माजी उपायुक्त श्री महबूब कासार यांना सद्भावना पुरस्कार देऊन गौरवांकित करण्यात आले आहे. श्री व सौ कासार हे लातूर जिल्ह्यातील असून ते आता नवी मुंबई येथे सीबीडी बेलापूर या परिसरात स्थायिक झालेले आहेत पण या परिवाराने समाजातील गरीब होतकरू विद्यार्थी शैक्षणिक क्षेत्रात विकासनस हील व्हावेत यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत .स्वतः श्री कासार यांनी दोन वर्षाची बिनपगारी सुटी काढून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात तयार करून घेतले आहे. या दोन्हीही व्यक्तीचा सामाजिक व शैक्षणिक कार्यात सतत पुढाकार राहिलेला असून त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ अनेक विद्यार्थ्यांना झाला आहे.. सामाजिक कार्यासाठी श्रीमती परविन सुलताना यांनी शैक्षणिक संस्थेची निर्मिती केली असून या संस्थेमार्फत संपूर्ण महाराष्ट्रात वेळोवेळी वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येतात. त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचा हा सत्कार करण्यात आला आहे . यास कार्यक्रमात डॉक्टर अहमद खान पठाण यांनी संपादित केलेले असत बाबांचा अस्मित करणारा जीवन प्रवास या गौरव ग्रंथाचे प्रकाशनही करण्यात आले. सिंदखेडराजा परिसरातील ह्या कार्यक्रमाला संपूर्ण महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्र बाहेरील असत बाबांचे चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सत्कार समारंभाचे औचित्य साधून या ठिकाणी दोन दिवसाचे आरोग्य शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम असे संचालन व आभार प्रदर्शन श्री अमजद खान पठाण यांनी केले

विशेष म्हणजे या कार्यक्रमाला तारक भाई का उलटा चष्मा या दूरदर्शनवरील गाजलेल्या मालिकेचे कलाकार श्री हेमंत देसाई हे देखील उपस्थित होते. सत्कार समारंभ नंतर रात्री कव्वालीच्या कार्यक्रमाने या कार्यक्रमाची सांगता झाली

 

प्रकाशनार्थ

प्रा.डॉ. नरेशचंद्र काठोळे

संचालक मिशन आय ए एस

अमरावती

प्रतिक्रिया व्यक्त करा