You are currently viewing श्री स्वामी समर्थ काव्य- वंदना

श्री स्वामी समर्थ काव्य- वंदना

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी अरुण वी देशपांडे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

।।श्री स्वामी समर्थ ।।

*श्री स्वामी समर्थ काव्य- वंदना*

    – काव्यपुष्प- ४ थे ।।

—————————————

केली प्रार्थना स्वामींना । द्यावी मज प्रेरणा । केलाय आरंभ

लेखना । व्हावे हे अखंडित ।। १ ।।

 

शरण समर्था जाऊ- रचना ।या आधीच्या लेखना । मिळे यातून प्रेरणा । मज लेखनाची ।।२।।

 

सर्वत्र उपलब्ध माहिती । वाचावी ती किती । वाटे, हे तर

शब्द- मोती । स्वामी चरित्राचे ।। ३ ।।

 

अक्कलकोटी जावे दर्शना । पुरतील सर्व कामना ।

व्यर्थ ना जाई प्रार्थना । स्वामी करिती कृपा सदा ।। ४ ।।

 

स्वामींचे उपदेश बोल । अर्थ असे त्यात खोल । घ्यावे

समजून हे बोल । होई कल्याण आपुले ।। ५ ।।

 

निर्मळ आचरण असावे । स्वभावे विसंगती नसावे ।

नामस्मरण करावे । श्रीहरीचे सदा ।। ६।।

 

प्रभुचरणी रमावा । श्री गुरूंचा आठव व्हावा । भक्त असा असावा । अपेक्षा हीच स्वामींची ।। ७ ।।।

*******

करी क्रमशः हे लेखन कवी अरुणदास

___________________________

कवी अरुणदास- अरुण वि.देशपांडे- पुणे.

___________________________

प्रतिक्रिया व्यक्त करा