*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी गीतकार गायक संगीतकार अरूण गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*
*”सुसंवाद”*
जगण्याला लय मिळते सुसंवादानं
टाळावे विसंवाद समृद्ध होई जीवनIIधृII
संवादाविना अंतर दरी जाते वाढत
नात्यांना लयबद्धता देणार साधन
संवाद साधावा सर्वांशी गमावू नये क्षणII1II
मानापमान अहं टाळावे मोठ्या मनानं
संवादाला वावडे नसते भाषा प्रांत हद्द
प्रश्न सुटती वाद मिटतात सुसंवादनII2II
अस्मिता अस्तित्व भान असते व्यक्तिगत
समजूत समज असावे मुद्यानं बोलणं
सकारात्मक रहावे टाळावे वादविवादII3II
असंख्य व्यक्ती प्रसंग भेटती प्रवासांत
ठेवावा संवाद काळ ठरविल कोण श्रेष्ठ
कोण घेऊन आला आयुष्याचा ताम्रपटII4II
राग लोभ जीवन नाण्याच्या बाजू दोन
सुखासाठी कधी नसते वय धर्म जात
माऊली सांगे मौन शब्दाविना होई संवादII5II
श्री अरुण गांगल कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन.410201.Cell.9373811677.