You are currently viewing आम्ही आळंदीला गेलो…

आम्ही आळंदीला गेलो…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*आम्ही आळंदीला गेलो…*

 

आम्ही आळंदीला गेलो, आम्ही आळंदीला गेलो

ज्ञानमाऊलीला भेटलो, आम्ही आळंदीला गेलो…

 

शिवचरण फाऊंडेशन, आहे फारच विलक्षण

राज्यभर आहे पसारा, फार मोठा आहे डोलारा

आळंदीत संमेलन घेतले,सारे न्हाऊन निघालो..

आम्ही आळंदीला गेलो…

 

जणू सजे लग्नमंडप,उपस्थिती होती हो खूप

एकाहून एक ते थोर, साहित्यातील महावीर

ज्ञानी, गुणवंत पाहिलो,साहित्य मधु प्राशिलो..

आम्ही आळंदीला गेलो…

 

ज्ञानप्राशण्यास हो जणू,होता जनसागर म्हणू

ज्ञानेश्वरे बांधली राखी,ती मुक्ताई लाडकी

तो देखणा होता सोहळा,होता पहा जगावेगळा

आम्ही धन्य धन्य हो झालो, आम्ही आळंदीला गेलो…

 

असा साहित्याचा जागर, जागोजागी हो प्रसार

कार्य महान आहे थोर, हा मराठीचा प्रचार

वाहून घेतले जीवन, असे आहेत शिवचरण

सारे अमृत प्राशिलो… आम्ही आळंदीला गेलो..

 

हातास भेटले हात, केली अडचणींवर मात

एक एक हिरा जोडिला, अन् अलंकार घडविला

विद्वान ग्रंथाचे कर्ते,असे संमेलन हे भरते

आम्ही सारेच भारावलो.. आम्ही आळंदीला गेलो..

आम्ही आळंदीला गेलो….

 

*संमेलना अध्यक्षा*

प्रा.सौ.सुमती पवार, नाशिक

तथा उज्जैनकर फाउंडेशनच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय सल्लागार (९७६३६०५६४२)

दि: ५ जानेवारी २०२५

वेळ: दुपारी ४ वाजता.

प्रतिक्रिया व्यक्त करा