You are currently viewing वेताळ बांबर्डे जि प प्राथमिक शाळेचे स्नेहसंमेलन मंगळवारी ७ जानेवारीला

वेताळ बांबर्डे जि प प्राथमिक शाळेचे स्नेहसंमेलन मंगळवारी ७ जानेवारीला

वेताळ बांबर्डे जि प प्राथमिक शाळेचे स्नेहसंमेलन मंगळवारी ७ जानेवारीला

सामाजिक कार्यकर्ते अतुल बंगे यांची प्रमुख उपस्थिती!

कुडाळ
वेताळ बांबार्डे गडकरी वाडा जि प पुर्ण प्राथमिक शाळेचे स्नेहसंमेलन मंगळवारी ७जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता होत असुन या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते तथा प्रतीयश उद्योजक मा श्री अतुल बंगे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून या कार्यक्रमाला उपस्थित पालकवर्गाने ग्रामस्थांनी उपस्थित रहावे असे आवाहन शाळा व्यवस्थापन समितीने केले आहे
वेताळ बांबार्डे जि प पर्ण प्राथमिक शाळा गडकरी वाडा या शाळेचे दरवर्षी स्नेहसंमेलन होत असते या संमेलनात ग्रामस्थ आणि पालक व शिक्षक वृंद मोठ्या उत्साहाने सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वी करत असतात यावर्षी ७जानेवारी ला होणा-या या कार्यक्रमाला स्वच्छता अभियान राज्य स्तरीय पुरस्कार प्राप्त मा सरपंच तसेच जिल्ह्य़ातील आदर्श व्यक्ती आणि प्रती यश उद्योजक मा श्री अतुल बंगे हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले आहेत या कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू असुन दुपारी ३ ते ५ बक्षीस वितरण ५ ते ८ मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत तरी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुशांत सावंत, उपाध्यक्ष रुपाली सावंत, प्रन्या यादव उपाध्यक्ष माता बालक संघ व मुख्याध्यापक रश्मी सावंत यांनी केले आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा