You are currently viewing शिवसेना आचरा विभागच्यावतीने ६ जानेवारीला मोफत आरोग्य शिबीर…

शिवसेना आचरा विभागच्यावतीने ६ जानेवारीला मोफत आरोग्य शिबीर…

शिवसेना आचरा विभागच्यावतीने ६ जानेवारीला मोफत आरोग्य शिबीर…

मालवण

शिवसेना जिल्हाप्रमुख देवदत्त ऊर्फ दत्ता सामंत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून संतोष कोदे मित्रमंडळ आणि शिवसेना आचरा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ६ जानेवारी रोजी सकाळी १०.३० ते दुपारी २.३० पर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्र आचरा येथे मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

या मोफत आरोग्य शिबीराचे उदघाटन शिवसेना मालवण तालुका प्रमुख महेश राणे, उपतालुका प्रमुख मंगेश गावकर, विभागप्रमुख चंद्रकांत गोलतकर, आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस यांचा हस्ते करण्यात येणार आहे. या शिबिरात जनरल मेडिसिन-नेफ्रोलौजीस्ट, नेत्ररोग तज्ञ, अस्थिरोगतज्ञ, स्त्री-रोगतज्ञ आदी तज्ञ डॉक्टर उपस्थित राहणार आहेत. तरी आचरा पंचक्रोशीतील जास्तीत जास्त रूग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन संतोष कोदे मित्रमंडळ आणि शिवसेना आचरा विभाग यांच्यावतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा