शिवसेनेला धक्का…
सावंतवाडी :
अतिशय प्रतिष्ठेच्या ठरलेल्या सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली ग्रामपंचायतीवरील सत्ता अपक्ष उमेदवार स्वागत नाटेकर यांच्या निर्णयावर अवलंबून राहणार आहे. या ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे वर्चस्व होते.
सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे, शिवसेनेचे नारायण उर्फ बबन राणे यांनी इन्सुली होम पिच वरील निवडणूक जिंकण्यासाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती.
नारायण राणे यांचे पुत्र साहिल राणे यांनीही पराभवाला सामोरे जावे लागले. या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला ६ तर शिवसेनेला ६ अशा समान जागा मिळाल्या. भाजपने उमेदवारी नाकारल्याने स्वागत नाटेकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज सादर केला होता. ते विजयी झाल्यामुळे सत्तेचा दोर स्वागत नाटकर यांच्या हाती आला आहे.