You are currently viewing चंद्रफुल

चंद्रफुल

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य लेखक कवी प्रा.डॉ.जी.आर. उर्फ प्रवीण जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*चंद्रफुल*

 

 

प्रेमाचा मंचक सजला

दरबारी रात खास

देशील का चंद्रफुल ते

दरवळतो सुवास

 

नभातील लोम्बणारे

झुंबरातील लोलक

तेजाची किरणे त्याची

चांदण्याचा मालक

कसे सांगू तुला आता

रात नभीची खास

देशील का चंद्रफुल ते

अजुनी त्याचा वास

 

मखमली ती नाजूक काया

फुलली उमलली ती राणी

मधूकोशी भ्रमर गुंजतो

अधीर झाली का वाणी

 

स्पर्श तुझा मऊ रेशमी

नको तुला हा त्रास

सोड कंचुकी उरोजाची

मिलनाची ती आस

 

नक्षत्रांच्या माळेत ओवला

नभी शुक्र तारा

क्षितिजा वर पहा आला

थंडगार तो वारा

 

तळ्याकाठी जमले आता

तृषार्त मग पक्षी

अलगद त्यांच्या चोचीतून

काढू लागे नक्षी

नक्षी काढता रंग सांडला

वाढली चकोर आस

देशील का चंद्रफुल ते

मिळू दे सहवास

 

प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

नसलापुर बेळगाव

कॉपी राईट

प्रतिक्रिया व्यक्त करा