*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री भारती महाजन रायबागकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*व्हावा इवला बिंदू*
स्वयंप्रेरणेने निवडलेला
कंटकमय आयुष्यपथ
प्रेरक-ज्योतीच्या प्रकाशात
होवो जीवन मार्गस्थ
तिने रुजवली घट्ट मुळे
देण्यास आसरा अनाथांना
लाखो हातांचा आधारवड
कशास आश्रय निराशांना
होऊनी त्या वटवृक्षाच्या
मजबूत पारंब्या आपण
व्रत समाजसेवेचे घेऊ
एकजुटीने सकलजन
तियेची जीवनगाथा व्हावी
दिशादर्शक सकलांना
माय, भगिनी,तात, बंधु
लाभो वंचित, निराश्रितांना
घेता तिजकडुन प्रेरणा
वात्सल्यसिंधूचा वसा
ममतामयी सागरातील
इवला बिंदू होईन कसा
@भारती महाजन-रायबागकर
चेन्नई
४-१-२५
9763204334.
©®या कवितेचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन