दोडामार्ग :
कुडाळ येथून ओव्हरलोड व बेकायदेशीररित्या गोव्याला वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरला आज दोडामार्ग तहसीलदार अमोल पोवार व त्यांच्या पथकाने ताब्यात घेत 1 लाख 80 हजार रुपये दंड ठोठावला आहे. ओव्हरलोड व बेकायदेशीररित्या दोडामार्ग मार्गे गोव्याला मोठ्या प्रमाणात चिरे, खडी वाहतुकीबरोबर वाळू वाहतूकही मोठ्या प्रमाणात केली जाते. आज कुडाळ येथून दोडामार्गमार्गे गोव्याला जिए 09 यू 9731 हा डंपर ओव्हरलोड व बेकायदेशीररित्या वाळू वाहतूक करताना दोडामार्ग बाजारपेठनजीक दोडामार्ग तहसीलदार अमोल पोवार यांना निदर्शनास आला. यावेळी तहसीलदार व त्यांच्या पथकाने ही गाडी ताब्यात घेतली. चौकशी केली असता त्या गाडीत ओव्हरलोड वाळू असल्याचे निदर्शनास आले. यावेळी 1 लाख 80 हजार रुपयाचा दंड गाडी मालकाला ठोठावण्यात आल्याचे दोडामार्ग तहसीलदार अमोल पोवार यांनी सांगितले.