*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*समाजवादी शब्द माझे…*
बेरीज वजाबाकी शब्दांची
गणमात्रा मोजत होतो
शालीन शब्दांच गारूड
जगण्यांत खर्चत होतो..
पवित्र जिव्हाळा शब्दांचा
तळहातावर अलगद ठेवला
शब्दांना हवाली करत
समाजवाद माझा जपला..
नाही कोणी मोठा
शब्दांना मान्य नाही
नाही कोणी छोटा
मला मान्य नाही..
जगणं जाळतात कवी
कवीला दुखवू नका
समाजवादी रचना शब्दांची
लहान-मोठा करू नका..
जेथे गेलो तिथे
कवीतल्या माणसाला निवडलं
प्रबोधनाची दिंडी काढत
शब्दांच्या अहंकाराला वगळलं..!
मनातलं मांडायचं इथे
कवींना दुखवू नका
लहान मोठा करून
वेगळं वागवू नका..!
बाबा ठाकूर धन्यवाद
शब्द माझे…बत्तीसावी रचना..
ठाकूरी उवाच..सात..!