*उबाठाचे कुर्ली ग्रा. पं. सदस्य योगेश कदम यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश*
*मंत्री नितेश राणे यांनी सर्वांचे पक्षात केले स्वागत*
उबाठाचे कुर्ली ग्रामपंचायत सदस्य योगेश आबासाहेब कदम व कार्यकर्ते कृष्णा दिनकर कदम, दत्ताराम विठोबा सावंत यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. मंत्री नितेश राणे यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले. वैभववाडी भाजपा कार्यालयनजीक पक्ष प्रवेश पार पडला. यावेळी भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.