You are currently viewing भाजपा सदस्यता अभियानाचा उद्या मेगा ड्राईव्ह

भाजपा सदस्यता अभियानाचा उद्या मेगा ड्राईव्ह

*भाजपा सदस्यता अभियानाचा उद्या मेगा ड्राईव्ह*

*नामदार नीतेशजी राणे प्रत्येक तालुक्यातील अभियानाला देणार भेट*

*एकाच दिवशी ५० हजार सदस्य संख्येचे उद्दिष्ट*

महाराष्ट्र राज्यात भारतीय जनता पार्टीचे सदस्यता अभियान सुरू असून उद्या दिनांक ०५ जानेवारी रोजी मेगा ड्राईव्ह अर्थात महाअभियान राबविण्यात येणार आहे.संपूर्ण जिल्ह्यात या महाअभियानाचे नियोजन पूर्ण झालेले असून जिल्ह्यातील एकूण ९२१ बुथवर उद्या दिवसभर हे अभियान सुरू राहणार आहे.
नामदार नितेशजी राणे उद्या जिल्हा दौऱ्यावर असून जिल्ह्यातील सर्व तालुक्याच्या अभियानाचा प्रत्यक्ष उपस्थितीत आढावा घेणार आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रात दीड कोटी सदस्य संख्येचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेले असून जिल्ह्यातील प्रत्येक बुथवर ३०० सदस्य अश्या एकूण ३ लाख सदस्य संख्येचे उद्दिष्ट जिल्ह्यासाठी आहे.
१ जानेवारी पासून सुरू झालेल्या या अभियानात जिल्ह्यात १२ हजार सदस्य नोंदणी पूर्ण झालेली असून उद्या दिनांक ०५ रोजीच्या मेगा ड्राईव्ह मध्ये ५० हजार सदस्य नोंदणी पूर्ण होईल.
जिल्ह्यातील सर्व भाजपा पदाधिकारी या अभियानाचे प्रदेश प्रभारी मा.रविंद्रजी चव्हाण,खासदार नारायणराव राणे, नाम नितेशजी राणे यांच्या मार्गदर्शनाखाली बुथवर जावून नोंदणी अभियानाला गती देत आहेत.दिनांक १५ जानेवारी पर्यंत हे अभियान सुरू राहणार असून जिल्ह्याला दिलेले ३ लाख सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट आम्ही पूर्ण करू अशी माहिती जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आणि या अभियानाचे जिल्हा संयोजक रणजित देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली.
उद्या दिनांक ०५ जानेवारी रोजी नामदार नितेश राणे हे खालीलप्रमाणे अभियानाला भेटी देतील.
# सकाळी १०.४५ वा जानवली भाजपा सदस्य नोंदणी अभियान भेट
# सकाळी ११.०० वा कणकवली शहर भाजपा सदस्य नोंदणी अभियान भेट
# सकाळी ११.४५ वा ओरोस फाटा भाजपा सदस्य नोंदणी अभियान भेट
# दुपारी १२.१५ वा कुडाळ भाजपा कार्यालय भाजपा सदस्य नोंदणी अभियान भेट
# दुपारी १.०० वा कोलगांव भाजपा सदस्य नोंदणी अभियान भेट
# दुपारी १.१५ ते १.४५ वा भोजन
# दुपारी २.०० वा सावंतवाडी भाजपा कार्यालय भाजपा सदस्य नोंदणी अभियान भेट
# दुपारी २.३० वा बांदा भाजपा सदस्य नोंदणी अभियान भेट
# दुपारी ३.३० वा वेंगुर्ला दाभोली नाका भाजपा सदस्य नोंदणी अभियान भेट
# सायंकाळी ५.०० वा मालवण भाजपा कार्यालय भाजपा सदस्य नोंदणी अभियान भेट
# सायं ६.१५ वा देवगड भाजपा कार्यालय भाजपा सदस्य नोंदणी अभियान भेट
याप्रमाणे मा मंत्री महोदय या अभियानाला भेटी देतील,दरम्यान प्रत्येक तालुक्यातील उद्याच्या दिवसाच्या नोंदणी अभियानाचा आढावा घेतील.तसेच निश्चित केल्याप्रमाणे सर्व पदाधिकारी आपापल्या बुथवर उपस्थित राहतील.
अशी माहिती जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा