*मा.आ. वैभव नाईक यांच्या हस्ते देण्यात आले नियुक्ती पत्र*
वैभववाडी :
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी लोरे नं. २ जिल्हा परिषद विभागाच्या विभागप्रमुख पदी सूर्यकांत सदाशिव परब यांची नियुक्ती केली असून सदर नियुक्तीचे पत्र माजी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते देऊन सूर्यकांत परब यांचे अभिनंदन करण्यात आले.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, वैभववाडी तालुकाप्रमुख मंगेश लोके, वैभववाडी माजी सभापती लक्ष्मण रावराणे, सचिन सावंत, महिला तालुका प्रमुख नलिनी पाटील, सिद्धेश राणे उपस्थित होते.