You are currently viewing स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड्मय पुरस्कार स्पर्धेसाठी 31 जानेवारीपर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड्मय पुरस्कार स्पर्धेसाठी 31 जानेवारीपर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड्मय पुरस्कार स्पर्धेसाठी 31 जानेवारीपर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी

मराठी भाषेतील उत्कृष्ट वाड्मय निर्मितीसाठी प्रकाशन वर्ष २०२४ करिता राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड्मय पुरस्कारांसाठीच्या प्रवेशिका जिल्हाधिकारी कार्यालयात (मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळून), तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात ३१ जानेवारी २०२५ पर्यंत पाठविण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिव मीनाक्षी पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले  आहे.

दिनांक १ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत प्रकाशित झालेली प्रथम आवृत्ती पुस्तके या स्पर्धेसाठी पात्र आहेत. या स्पर्धेची नियमावली व प्रवेशिका सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्यमंदिर इमारत, दुसरा मजला, सयानी मार्गप्रभादेवी मुंबई ४०० ०२५ यांच्या कार्यालयात तसेच मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळता अन्यत्र संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात (सर्वसाधारण शाखा अथवा करमणूक शाखा) विनामूल्य उपलब्ध होतील.

महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर ‘नवीन संदेश’ या सदरात ‘स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड्मय पुरस्कार २०२४ नियमावली व प्रवेशिका’ या शीर्षाखाली व ‘What’s new’ या सदरात ‘Late Yashwantrao Chavan State Literature Award २०२४ Rules Book and Application Form’ या शीर्षकाखाली व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या http://sahitya.marathi.gov.in  या संकेतस्थळावर प्रवेशिका व नियमपुस्तिका उपलब्ध होतील. प्रवेशिका पूर्णतः भरुन आवश्यक साहित्यासह सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात दिनांक १ जानेवारी २०२५ ते ३१ जानेवारी २०२५ या विहित कालावधीत पोहचतील अशा बेताने पाठवाव्यात.

लेखक, प्रकाशक या स्पर्धेसाठी प्रवेशिका दाखल करु शकतात. मुंबई शहर व मुंबई उपनगर या दोन जिल्ह्यातील लेखक, प्रकाशकांनी पुस्तकांच्या दोन प्रतीसह विहित नमुन्यातील प्रवेशिका सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्यमंदिर इमारत. दुसरा मजला, सयानी मार्गप्रभादेवीमुंबई ४०० ०२५ येथे पाठवाव्यात. मुंबई शहर व मुंबई उपनगर  दोन जिल्हे वगळून अन्य ठिकाणच्या लेखक, प्रकाशकांनी संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये हे साहित्य दिनांक १ जानेवारी २०२५ ते ३१ जानेवारी २०२५ या विहित कालावधीत पाठवावे, असे आवाहन सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांनी केले आहे. लेख, प्रकाशकांनी मंडळाकडे प्रवेशिका व पुस्तके पाठविताना सदर बंद लिफाफ्यावर पाकीटावर ‘स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाड्मय पुरस्कार २०२४ साठी प्रवेशिका’ असा स्पष्ट उल्लेख करावा. प्रवेशिका व पुस्तके स्विकारण्याचा अंतिम दिनांक ३१ जानेवारी २०२५ हा राहील. विहित कालमयांदेनंतर (१ जानेवारी २०२५ ते ३१ जानेवारी २०२५) येणाऱ्या प्रवेशिका स्पर्धेसाठी स्विकारल्या जाणार नाहीत.

००००००

चाचा नेहरु बाल महोत्सवाचे आयोजन

 सिंधुदुर्गनगरी, दि. 4 (जि.मा.का.) : जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या शासकीय स्वयंसेवी संस्थांमध्ये पुनर्वसनासाठी दाखल झालेल्या निराधार, उन्मार्गी मुलांमधील सुप्त गुणांना वाव देऊन त्यांच्यात एकमेकांविषयी बंधुभाव, सांघिक भावना निर्माण होण्यासाठी महिला व बालविकास विभागाच्यावतीने जिल्हास्तरीय चाचा नेहरु बाल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव 6 ते 8 जानेवारी 2025 या कालावधीत दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय पणदूर तिठा ता. कुडाळ येथे आयोजन करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी दिली .

या बालमहोत्सवात जिल्ह्यातील कार्यरत बालगृहातील प्रवेशीत बालके, तालुकास्तरावर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनावर कार्य करणाऱ्या संस्थामधील काळजी  व संरक्षणाची गरज असणारी बालके व  स्थानिक शाळामधील मुले, मुली सहभागी होतील. यामध्ये वैयक्तिक नृत्य, गायन, एकपात्री अभिनय, सामुहिक नृत्य, उंच व लांब उडी, कॅरम, बुध्दीबळ, गोळा फेक, कब्बडी, खो-खो, रिले, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादी स्पर्धांचे आयोजन केलेले आहे.

 

या कार्यक्रमासाठी मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे, खासदार नारायण राणे, आमदार सर्वश्री निरंजन डावखरे,  ज्ञानेश्वर म्हात्रे, दिपक केसरकर, निलेश राणे, जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, जिल्हा पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल,  कोकण विभागाचे महिला व बाल विकास, विभागीय उपआयुक्त श्रीम.सुवर्णा पवार, सावंतवाडीचे  प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी  तथा बाल न्याय मंळाचे अध्यक्ष श्रीम. जे. एम. मिस्त्री, जिल्हा विधी व सेवा प्राधिकरण सचिव श्रीम. एस. के. कारंडे, (माध्यमिक) शिक्षणाधिकारी श्रीम.कविता शिंपी, बाल कल्याण समितीचे अध्यक्ष अँङ संदेश तायशेटे, बाल कल्याण समितीचे सदस्य अँङ अरुण पणदूरकर, बाल कल्याण समितीचे सदस्य अँङ श्रीम. नम्रता नेवगी, बाल कल्याण समितीचे सदस्य प्रा. अमर निर्मळे,  बाल कल्याण समितीचे सदस्य प्रा. श्रीम. माया रहाटे, बाल न्याय मंडळ सदस्य श्रीम. कृतिका कुबल,  पणदूर शिक्षण प्रसारक मंडळ वेताळ बांबर्डे विभाग संस्था अध्यक्ष रघुनाथ गावडे, पणदूर शिक्षण प्रसारक मंडळ वेताळ बांबर्डे विभाग संस्था सचिव नागेंद्र परब, पणदूर कनिष्ठ महाविद्यालय, दादासाहेब तिरोडकर मुख्यध्यापक एस.डी. गावकर आदी उपस्थिती राहणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा